आणि त्यांनी वडिलांच्या स्मरणार्थ भरविला हो.म……

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १६ सप्टेंबर २०२२ । बारामती । “घरातील गृहणी असो किंवा विविध क्षेत्रातील नोकरदार, शेतमजूर, व व्यवसायिक महिलांना चूल व मूल विचारा पलीकडे जाऊन वर्षातून एकदा तरी त्यांच्या मधील कला गुणांना व्यक्त होण्यासाठी संधी देत जावा ” हि वडिलांची इच्छा असल्याने बारामती मधील व्यवसायिक प्रमोद डिंबळेपाटील यांनी त्यांचे वडील कै. चंद्रकांत राघू डिंबळेपाटील यांच्या स्मरणार्थ आमराई, भोरी व नागवडे चाळ, तावरे बंगला परिसरातील महिलासाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार दि.13 सप्टेंबर रोजी केले होते. अखिल आमराई तरुण मंडळ च्या सहकार्याने प्रमोद डिंबळेपाटील यांनी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करून वडिलांची इच्छा पूर्ण केली.

अनिल सावळेपाटील प्रस्तुत “होम मिनिस्टर, खेळ रंगला वहिनींचा ” या कार्यक्रमात खेळ, मनोरंजन, उखाणे, म्हणी, चित्रपटाची गीते, नृत्य, मुली व महिलांनी सादर केले तर बेटी बचाव,भेटी पढाओ व पर्यावरण प्रेमी व्हा हा संदेश महिलांनी उखाण्यांतून दिला.प्रथम क्रमांक अनिता निघूल, द्वितीय क्रमांक सीमा बडे, तृतीय क्रमांक रेश्मा कार्यकर यांनी विविध स्पर्धेतून मिळविला तर चंदूकाका सराफ अँड सन्स यांच्या वतीने महिलांना विविध दागिने खरेदी योजना व ठुशी महोत्सव ची माहिती देण्यात आली.

महिलांना व मुलींना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिल्यास महिला सर्वच क्षेत्रात चमकदार कामगिरी करू शकतात म्हणून बचतगट महिला व स्पर्धा परीक्षेतील मुलींसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सौ पूजा प्रमोद डिंबळेपाटील यांनी सांगितले. विजेत्यांना पैठणी व सोन्याची अंगठी, सोन्याची नथ व सोन्याची ठुशी देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. मुलगी वाचवा व पर्यावरण वाचवा या विषयी गीते सलीम सय्यद यांनी गायली.आभार प्रमोद डिंबळेपाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!