शिवजयंती निमित्त औंधमध्ये प्राचीन व अर्वाचीन नाणी प्रदर्शन!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, औंध, दि.१६: औंध येथील शिवसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने शिवजयंती निमित्त किमान २६०० वर्षांपूर्वीची प्राचीन व अर्वाचीन दुर्मिळ नाण्यांचे प्रदर्शन दिनांक १७ व १८ फेब्रुवारी रोजी औंध येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष निलेश खैरमोडे यांनी दिली.

शिवसंकल्प प्रतिष्ठानकडून नेहमीच विधायक कार्यक्रम राबविले जातात. वृक्षारोपण, रक्तदान शिबीर, स्वच्छता मोहीम,पशु-पक्ष्यांच्या अन्नपाण्याची सोय अशा विविध प्रकारच्या कार्यक्रम राबविले जातात,यंदा शिवजयंती उत्सव निमित्त हजारो वर्षापुर्वीचा वैभवशाली इतिहास प्रत्यक्ष पहायला व अनुभवायला मिळणार आहे,

दुर्मिळ नाण्यांच्या प्रदर्शनात शक, कुषाण , सातवाहन, यादव,चालुक्य , शुंग, मौर्य, मराठा, या पराक्रमी वंशातील अनेक सम्राटाची नाणी तसेच मुघल, निजाम,ब्रिटिश , व इतर मुस्लिम राज्यकर्त्याची नाणीही पहायला मिळणार आहेत, तसेच चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक,अकबर ,औरंगजेब ,शहाजहान,छ.शिवाजी महाराज , संभाजी महाराज,राजाराम महाराज , शाहु महाराज यांच्या काळातील नाणी .या प्रदर्शनात पहायला मिळतील.तरी औंध पंचक्रोशीतील नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.


Back to top button
Don`t copy text!