स्थैर्य, सातारा, दि.२८: सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील रहिवासी व दैनिक ग्रामोध्दार चे जुने कर्मचारी आनंदराव हेळकर ( वय ८२) यांचे आज उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांचे पार्थिवावर संगम माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे मागे पत्नी , दोन विवाहित मुले , विवाहित मुलगी , सुना , जावई , नातवंडे असा परिवार आहे . सोनगाव तर्फ सातारा येथील सामाजिक, राजकीय , सांस्कृतिक क्षेत्रात ते सक्रिय सहभाग घेत. पंचक्रोशीतील नाट्यचळवळ वाढावी यासाठी ते प्रयत्नशील असतं. अनेक ग्रामिण नाटकातून त्यांनी भुमिका केल्या होत्या. सर्जा राजा या चित्रपटातही त्यांनी छोटी भुमिका केली होती . ग्रामोध्दार प्रिंटिंग प्रेस मध्ये त्यांनी ग्रामोध्दारकार रा.बा. उर्फ भाऊसाहेब जाधव यांनी त्यांना नोकरीसाठी घेतलं. विशेष म्हणजे आनंदराव हेळकर हे ग्रामोध्दार परिवारातील सदस्यच होऊन गेले. अत्यंत विश्वासू असे आनंदराव हेळकर होते. ग्रामोध्दार प्रिंटिंग प्रेस , ग्रामोध्दार पाक्षिक , साप्ताहिक , अर्ध साप्ताहिक , ते दैनिक ग्रामोध्दारच्या प्रदिर्घ प्रवासाचे ते साक्षिदार होते.