“ध्येयवेड्या माणसाचा असामान्य प्रवास!”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । फलटण । समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे अधिक भयानक असतात! मनातील उभ्या असणाऱ्या वादळरूपी ध्येयास जिद्दीच्या जोरावर पैलतिरी पोहोचवण्यासाठी एक ध्येयवेड्या माणसाचा असामान्य प्रवास आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. जीवन जगत असताना जन्माला आलेला प्रत्येक जणच आपापल्या पद्धतीने जीवनाची पाने पलटत जात असतो मात्र फार कमी लोक असतात त्या पलटलेल्या पानांनाही सोनेरी मुलामा देत प्रत्येकाच्या मनावर त्या पलटलेल्या पानाची आदर्शवत सावली ठेवून पुढे पाऊले टाकत पाठीमागे उमटलेल्या पावलांच्या परिस्पर्शाने प्रत्येकामध्ये नवीन ऊर्जेचा स्रोत निर्माण करत असतात. अशाच अद्भुत रसायनाची म्हणजेच के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनल प्रा. लिमिटेड, के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा. लिमिटेड, NEWAGE इनोवेशन्स प्रा. लिमिटेड व ग्रीन इरा या कंपनीच्या डायरेक्टर पदाची जबाबदारी सक्षम खांद्यांवर पेलणाऱ्या डायरेक्टर श्री. सचिन यादव यांच्या संघर्षमय व अडथळ्यांना प्रेरणा बनवत केलेल्या प्रवासाची कहाणी थेट आपल्यापर्यंत.

मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात शिरवली ता. बारामती येथे 24 डिसेंबर 1977 यांचा जन्म झाला. वडिलांचा शेती व्यवसाय असल्यामुळे शेतीशी त्यांची बालपणापासूनच अतूट नाळ जोडली गेली होती. शेती करत असताना शेतकऱ्यांना बसणाऱ्या चटक्यांची जाणीव त्यांना आपसूकच लहान वयातच जाणवली होती. महात्मा गांधी बालक मंदिर, बारामती येथे प्राथमिक, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात महाविद्यालयीन, मालोजीराजे शेती विद्यालय फलटण येथे उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असताना शेतीतून निघणारे तुटपुंज्या उत्पन्नावर शैक्षणिक जीवनाची घडी बसवत असताना कराव्या लागलेल्या कसरतीच्या जखमा वेळोवेळी वेदना आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या कार्याची दिशाच जणू स्पष्ट करत होते. तत्पूर्वी महाविद्यालयीन शिक्षण बारामतीला घेत असतानाच बारामतीमधील प्रमुख हॉटेल व्यावसायिकांना घरचा पशुपालनाचा जोडधंदा असल्यामुळे दुधाचा पुरवठा घरूनच केला जात होता. त्यामुळे व्यवसायाचे बाळकडू कमी वयातच घरातून मिळाले होते. महाविद्यालयीन शिक्षण कृषी कॉलेज, पुणे इथे पूर्ण करत असतानाच बेबीकॉर्न या दोन पिकाशी 1994 – 95 साली पासूनचा निकटचा संपर्क होता. शिक्षणाचा संदर्भ पहिला तर शेती हाच त्यांचा जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे महाविद्यालयीन कालावधीत कृषी संबंधीत शेतकरी उपयोगी विविध यशस्वी प्रयोगही त्यांनी केले. शैक्षणिक टप्पा पार पडल्यानंतर सरांनी कारकिर्दीला सुरुवात केली ती डी. वाय. पाटील ट्रस्ट द्वारे कृषी विज्ञान केंद्र, कोल्हापुर येथे नेहमीच नवनवीन शिकण्याची ओढ त्यांना कधीच शांत बसू देत नव्हती, यातून अधिकाधिक वाचनही त्यांनी केले त्यामुळे नवनवीन कल्पना व संकल्प यांना एक दिशा भेटत गेली. यात प्रमुख भर पडली ती म्हणजे 2008 साली, के. बी. एक्सपोर्टस इंटरनॅशनलची पायाभरणी फलटण तालुक्यात झाली. याच एक आव्हान म्हणून स्वीकार करत शेतकऱ्यांना अगदीच नवख्या असणाऱ्या एक्स्पोर्ट या विषयी माहिती पोहोचवण्यासाठी घड्याळालाही लाजवेल अशी कामगिरी करत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून अडचणी समजून घेत एक्स्पोर्ट संदर्भात रेसिड्यू फ्रि उत्पादनांची संज्ञा प्रत्येक शेतकऱ्यांमध्ये बिंबवत शेतकऱ्यांना जणू भरारीसाठी पंखच दिले. खुर्चीला चिकटून राहण्यापेक्षा प्रत्येक्षात जिथे प्रोसेसिंग चालू असेल त्या ठिकाणी उतरून तिथल्या अडचणी समजून घेऊन त्या ठिकाणची क्षमता वाढविण्यासाठी आधुनिकतेचा प्रयोग करून अजून दुपटीने उत्पादन क्षमता वाढवून कंपनी कामास वेग देणे, एवढेच नव्हे तर अगदी शेतकऱ्यांच्या वा युरोपात जाणाऱ्या माल वाहतूक वाहनांचे चेकिंग स्वतः करणे इत्यादी बारीक गोष्टीवर करडी नजर ठेवून आपले कार्य बजावत असत. हे करत असतांना सरांची पेन आणि डायरी हा अगदी जिव्हाळयाचा विषय होता. यातून त्यांच्या तत्परतेचे, बारकाईचे आपसूकच दर्शन घडते. रेसिड्यू फ्री कृषीमालाची निर्यात युरोपियन मार्केटमध्ये अव्वल क्रमांकाने चालू झाली. याच विश्वासाच्या बळावर आज भेंडीसोबतच डाळिंब, बेबीकॉर्न, आंबे, कडीपत्ता, दुधी अशा ताज्या पालेभाज्या व फळे यांची मोठ्या प्रमाणात होत असणारी मागणी व तितक्याच विश्वासाने ते अवघ्या 24 तासात भारतातून एक्स्पोर्ट केले जात आहे. यासोबतच अगदी विदेशी फळ म्हणून ओळखले जाणारे ड्रॅगन फ्रुट देखील निर्यात करत आहे व असे करणारी भारतातील पहिली निर्यात कंपनी बनण्याचा मान मिळाला आहे ज्याची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने देखील दखल घेऊन कौतुक केले आहे.

युरोपात निर्यात करत असताना घातक रासायनिक कीटकनाशकांचे अंश यामुळे अडथळे निर्माण होतील याची चाहूल लागताच शेतकरी बांधवांच्या हातातोंडाशी आलेला घास वाचवण्यासाठी श्री.सचिन यादव सर यांनी विविध तज्ञ शास्त्रज्ञांना सोबत घेऊन विविध वनस्पतींच्या अल्कोलॉइड्स पासून वनस्पतीजन्य जैव कीटकनाशके बनवणाऱ्या के. बी. बायो ऑरगॅनिक्स प्रा.ली. कंपनीची स्थापना केली. यामुळे आज शेतकऱ्यांना निरोगी व निर्यातक्षम कृषीमालाचे उत्पादन मिळवण्यासाठी बाजारात एक सक्षम पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या औषधांच्या वापरामुळे शेतकऱ्यांसोबतच कृषी मालाचा वापर म्हणजेच फळे भाजीपाल्याचे सेवन करणाऱ्या सामान्य नागरिकांना देखील रसायनमुक्त अन्न मिळविणे सोपे झाले आहे. कंपनीची वृद्धी करत असतांना शेतकऱ्यांच्या सेवेत कधीच खंड पडू न देता वेळोवेळी कंपनीच्या कायदेशीर व संरक्षणामक दृष्ट्या पाऊले टाकत कंपनी कार्यात कधीच कोणता अडथळा निर्माण न होऊ देता कंपनीच्या वेगात भर टाकत आहेत यातून सरांचा दूरदृष्टीकोन स्पष्ट अधोरेखित होतो. या कंपनीच्या स्थापनेमुळे फलटण, बारामती, पुरंदर, इंदापूर, माण – खटाव, माळशिरस तालुक्यातील तसेच इतर राज्यातील हजारो कुशल अकुशल कामगारांच्या हाती काम देण्याच भाग्य यांनी मिळवले. कंपनीने कमी कालावधीत उत्तुंग अशी भरारी घेत भारतातील 12 प्रमुख राज्यांमध्ये कंपनीची सुरुवात करत शेतकऱ्यांचे एक विश्वासाचे केंद्रच या राज्यांमध्ये पोहोचल्याचा आनंद शेतकऱ्यांना मनोमन के. बी. बायोच्या माध्यमातून वाटत आहे. अधिक जलद गतीने सेवा प्रदान करता यावी यासाठी इंदोर (मध्यप्रदेश) येथे ऑफिस स्थापनाही करण्यात आली आहे व देशाची राजधानी दिल्ली येथे लवकरच कंपनीच्या नवीन ऑफिसची स्थापना करण्यात येणार आहे. निरोगी व सदृढ भारत घडवण्याच्या दृष्टीकोनातून अनेक शेतीसंबंधी व्यवसायिकांनाही शेतकऱ्यांच्या सेवेसाठी अधिक जलद गतीने उपलब्ध राहता यावे, त्यांच्या उद्योगास चालना मिळावी यासाठी NEWAGE इनोवेशन्स प्रा. लिमिटेड कंपनीची स्थापनाही श्री. सचिन यादव यांनी केली. त्यामुळे छोट्या उद्योजकांनाही त्यांच्या व्यवसायाचा ब्रँड बनवणे सहज शक्य झाले आहे. भविष्यावर नजर ठेवत वर्तमान व भविष्यकाळात रसायनमुक्त उत्पादने प्रत्येक भारतीयाच्या ताटात पोहोचावीत यासाठी ग्रीन इरा कंपनीची स्थापना करत सरांची विचारांची सखोलता अजूनच मनामध्ये स्थान वाढवत जाते.

उद्योग क्षेत्रात काम करणाऱ्यांची अनेक वेळा सामाजिक जाणीव मावळलेली आपण सर्रासपणे पाहत आहोत. मात्र हा विचार आपण श्री. सचिन यादव सर यांच्याकडे पाहिल्यावर पूर्णपणे बदलून जातो व अनेक वेळा या माणसाच्या प्रेमात पडावे अशी सामाजिक कामांची यादी समोर उभा राहते. कोरोना सारख्या महामारीमध्ये असंख्य कुटुंबाना घरगुती वापरासाठी अत्यावश्यक असणाऱ्या धान्य, किराणा स्वरूपात किट वाटप सरांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले. लगोलग कोल्हापूर,सांगली, कोकण भागात आलेल्या महापुरात सुद्धा श्री.सचिन यादव यांनी कंपनीतर्फे विविध लोकांना मदतीचा हात दिला या समाजकार्यातून सरांची उंची अजून वाढलेली दिसते. एवढेच नव्हे तर “कंपनी एक कुटुंब” समजून प्रत्येकाच्या अडीअडचणीत सर सर्वप्रथम उभा असतात. जिथे डॉक्टर प्रयत्न सोडतात तिथे सर स्वतःची यंत्रणा कामाला लावून डॉक्टरांच्या मदतीने कर्मचाऱ्यांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढल्याची अनेक उदाहरणे आहेत. अवेळी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीच्या जाण्याने होणारी दशा व सरांना भेटून त्यांच्या व्यथा सांगताना दर्यादिल सरांच्या मनाची हळहळ होणे साहजिकच होते. यावर उपाययोजना व आरोग्याच्या संबंधित कोणावरच अशी वेळ वा तक्रारच येऊ नये यासाठी वनस्पतींचा वापर करून बनविलेली कीटकनाशकांचा यशस्वी व क्रांतिकारी प्रयोग झाल्यानंतर लवकर आयुर्वेदाच्या धर्तीवर वनस्पतींचा वापर करून मानवी जीवनातील दुर्धर आजार व रोगांवर उपचार करण्यासाठी 100X आयुर्वेदा प्रा. लि. कंपनीची सुरुवात होत आहे. असा हा तेजोमय प्रवास दिवसेंदिवस अधिक वेगाने संबंध शेतकरी, मानव जातीच्या सेवेसाठी भारताबरोबर संपूर्ण जगात पोहोचवण्यासाठी अधिक वेगाने सक्रियपणे प्रयत्नशील राहणार आहे. सर आमचा आपणास व आपल्या अवर्णनीय कार्यास मनापासून सॅल्यूट!


Back to top button
Don`t copy text!