साताऱ्यात तांदूळ आळी येथे वृध्देला मारहाण


दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । सातारा । सातार्‍यातीलत तांदूळ आळी येथे बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी घरातून घुसून वृध्द महिलेला बेदम मारहाण करत चोरी केली. प्राथमिक माहितीनुसार चोरट्यांनी घरातून देवतांच्या मुर्ती चोरी केल्या आहेत. दरम्यान, वृध्द महिला मारहाणीत बेशुध्द पडल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

उषा दामोदर माजगावकर (वय 81, रा.तांदूळ आळी परिसर, सातारा) असे जखमी झालेल्या वृध्द महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, वृध्द महिला घरात घटनेवेळी एकट्या होत्या. रात्री 10 वाजण्याच सुमारास घरात काही चोरटे शिरले. चोरट्यांनी वृध्देला दमदाटी, शिवीगाळ करत मारहाण केली. वृध्देने चोरट्यांचा प्रतिकार केला मात्र चोरट्यांनी बेदम मारहाण करत त्यांना बांधून ठेवले. या घटनेत त्या बेशुध्द पडल्या.

मारहाणीच्या घटनेनंतर चोरट्यांनी घरातील देवतांच्या मुर्ती चोर्‍या केल्या व तेथून पळ काढला. दरम्यान, ही घटना समोर आल्यानंतर परिसरात भितीचे वातावरण नर्मिाण केले. शेजारी असणार्‍यांनी जखमी वृध्द महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली. मात्र वृध्द महिला बेशुध्द असल्याने नेमक्या घटनेची माहिती मिळण्यास पोलिसांना अडचण आली. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर त्यांना काही क्लू मिळाले असून पोलिसांनी विविध अंगाने तपासाला सुरुवात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!