
स्थैर्य, सातारा, दि. १०: वडगाव, ता. सातारा येथील उरमोडी धरण जलाशयात महिलेचा बुडून मृत्यू झाला. द्रौपदा लक्ष्मण जांभळे वय 65 रा. कुडेघर, ता. सातारा असे महिलेचे नाव आहे. दि. 8 रोजी द्रौपदा जांभळे या पाय घसरल्याने उरमोडी धरणात पडल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची खबर दर्शना सुरेश शेडगे यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. हवालदार बर्गे तपास करत आहेत.