न्यायालयीन आदेशाचे उल्लंघनप्रकरणी एकावर गुन्हा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । सातारा । न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी समीर विनोद देखणे रा. वाढे ता. सातारा याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत सातारा तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ एप्रिल रोजी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा न्यायालयाचे दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एका खटल्याच्या संदर्भात दिलेल्या तारखेस उपस्थित राहिला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्याला काढलेल्या नॉन बेलेबल वॉरंटीच्या बजावणी वेळी तो मिळून न आल्याने न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीस हवालदार प्रकाश व्यंकटराव माने यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान अशाच प्रकारचा गुन्हा मिलिंद शामराव देखणे रा. वाढे, ता. सातारा याच्या विरोधात दाखल करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!