लोणंदमध्ये चारचाकी वाहनाच्या झडतीत आढळली लोखंडी तलवार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.३० एप्रिल २०२२ । सातारा । दिनांक २९ एप्रिल २०२२ रोजी रात्रौ. ०२:०० वाजलेच्या सुमारास लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील मौजे तरडगाव तालुका फलटण येथे बसस्थानकासमोर नाकाबंदी करीत असताना. लोणंद ते फलटण जाणारे रोडवर एक शेवरलेट कंपनीची संशयित कार दिसल्याने सदर कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार मिळून आल्याने सदर संशयित नाव गणेश विठ्ठल गायकवाड वय 30 राहणार तरडगाव तालुका फलटण याच्यावर लोणंद पोलीस ठाणे शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई लोणंद पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर, पोलीस नाईक योगेश कुंभार,फैय्याज शेख, शिवाजी सावंत यांनी केली असून अधिक तपास सपोनि विशाल वायकर यांचे मार्गदर्शनाखाली श्रीनाथ कदम हे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!