जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त एक अभिनव कार्यक्रम “माझिया मना”

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १२ ऑक्टोबर २०२२ । सोलापूर ।  सकारात्मक दृष्टीकोन ठेवल्याने मानसिक स्वास्थ्य सुदृढ होत असल्याचे प्रतिपादन प्रमुख जिल्हा न्यायाधीश डॉ. शब्बीर अहेमद औटी यांनी केले.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांचे किमान समान कार्यक्रमाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सोलापूर यांच्यातर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा न्यायालय येथे ‘माझिया मना’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. यावेळी डॉ. औटी बोलत होते. यावेळी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रसन्ना खटावकर प्रमुख वक्ते होते. त्यांनी मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावयाची याबाबत विवेचन केले. वैद्यकीय सेवा आणि न्यायालयीन कामकाज हे एकमेकांशी निगडीत आहेत. दोन्ही ठिकाणी मनुष्य हा केंद्रबिंदू असतो, मानसिक आरोग्य सक्षम ठेवण्यासाठी ताणतणावापासून मुक्त जीवन जगून संतुलित आचरण ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मानसिक बाधा हा आजार नसून बदललेली मानसिक स्थिती असते. त्यामुळे अशा व्यक्तीकडे भावनिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न करून त्यानुसार योग्य उपचार केले जातात.

न्यायालयीन कामकाज करीत असताना न्यायाधीशांनी अखंड न्यायप्रक्रियेचा विचार करत असताना संयमितपणे त्या-त्या प्रकरणाकडे पाहिल्यास मानसिक संतुलन राखले जाते, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश नरेंद्र जोशी यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा सरकारी अभियोक्ता प्रदिपसिंग रजपूत, मुख्यालयातील न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे, व्ही. एच. पाटवदकर, श्रीमती के.डी. शिरभाते, श्रीमती एस. आर. शिंदे, श्रीमती आर.डी. खेडेकर, एस.एस. जहागीरदार, व्ही.आय. भंडारी, आर.यु. नागरगोजे, ए.ओ. जैन, श्रीमती एस. एन. रतकंठवार, श्रीमती एम. के. कोठुळे, यु.पी. देवर्षी, श्रीमती एस.व्ही. देशपांडे, श्रीमती जे. एम. काकडे, श्रीमती ए.सी. पारशेट्टी, श्रीमती एन.एम. बिरादार, एम. जे. मोहोड, एस. आर. सातभाई, श्रीमती आर.के. जंगम, श्रीमती बी.ए. भोसले आदि न्यायाधीशांसह विधी सेवा प्राधिकरणाच्या पटलावरील विधीज्ञ व कर्मचारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!