दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । बारामती । तो काळ गेला, धर्माच्या नावाने दंगला उडायच्या, आजचा काळ आहे एकोपा ठेवुन महाराष्ट्र समृद्ध करण्याचा. या अनुषंगाने बारामती तालुक्यातील ज्ञानसागर इंग्लिश मिडीयम स्कुल व ज्युनिअर कॉलेज, सावळ या शाळेत पालखी सोहळा या कार्यक्रमाचे नियोजन करून विद्यार्थ्यांनी एकोपा ठेवुन महाराष्ट्र समृद्ध करण्याचा प्रयत्न कसा करता येईल याचं उत्तम प्रदर्शन आपल्या या छायाचित्रातून दिसुन येत आहे. ज्ञानसागरमध्ये एलकेजी(लहान गटात)या वर्गात शिक्षण घेणा-या मुस्लिम बांधवाच्या अर्श शाहिद मुजावर या विद्यार्थ्यांला त्यांच्या पालकाने संत तुकाराम महाराजांच्या वेशभुषा करून ज्ञानसागर च्या पालखी सोहळ्यात सहभागी केले*.एका मुस्लिम बांधवाने त्याच्या मुलाला संत तुकारामांची वेशभूषा केल्यामुळे सर्व पालकांनी, ग्रामस्थांनी, तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले.यातून असे दिसून येते कि ज्ञानसागर मध्ये सर्वधर्म समभाव ही शिकवण विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या पद्धतीने रुजवण्याचा उत्तम प्रयत्न केला जातो.
तूझा रे आधार मला। तूच रे पाठिराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
राम कृष्ण हरी माऊली।।
सातशे वर्षांहून अधिक काळ अखंड निघणारी पंढरीची वारी हा महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रांतला एक चमत्कार आहे*
शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी आनंदात व उत्साहात पालखी सोहळा पार पाडला. या सोहळ्यात काही विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, मुक्ताई यांच्या वेशभूषेत ही पालखी निघाली.तसेच अनेक विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा केली व वारकरी संप्रदायातील अनेक भक्ती गीते,भजन गात ही वारी संपन्न झाली. या वेळी प्रमुख पाहुणे सपकळवाडी व उदमाईवाडी गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ, ज्ञानसागर गुरुकुलचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. सागर आटोळे , उपाध्यक्षा रेश्मा गावडे,सचिव मानसिंग आटोळे, दिपक सांगळे, दिपक बिबे, सीईओ संपत जायपत्रे, विभागप्रमुख गोरख वणवे, प्राचार्य दत्तात्रय शिंदे, निलीमा देवकाते, स्वप्नाली दिवेकर,राधा नाळे, यांचेसह सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.