युवकांचा आवाज बुलंद करण्यासाठी ‘द बॉडी शॉप इंडिया’चा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । मुंबई ।  भारतीय तरुणांचा सार्वजनिक स्तरावरील सहभाग वाढविण्यासाठी चालविल्या जाणाऱ्या व्हाय२५ (Why25) या सर्वसमावेशक आणि कोणत्याही पार्टीशी संबंधित नसलेल्या सामाजिक प्रभाव प्रयत्नाला पाठबळ देण्यासाठी द बॉडी शॉपने यंग इंडिया फाउंडेशनच्या सहयोगाने ‘बी सीन बी हर्ड’ हा उपक्रम सुरू केला आहे.

व्हाय२५ च्या माध्यमातून युवकांचा आवाज सार्वजनिक आयुष्यात अधिक जोरकसपणे ऐकू यावा यासाठी बॉडी शॉपने यंग इंडिया फाउंडेशनबरोबर भागीदारी केली आहे. नव्या पिढीकडून आपल्या देशाच्या भविष्यावर परिणाम करणाऱ्या गोष्टींच्या बाबतीत आपले म्हणणे सुस्पष्टपणे मांडले जावे याची काळजी या उपक्रमाच्या माध्यमातून घेतली जाणार आहे.

व्हाय२५ कार्यक्रम तीन मुख्य उद्दीष्टांच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णयप्रक्रियेतील युवकांच्या सहभागाला दीर्घकालीन पाठबळ पुरवणार आहे. यात व्हाय२५ याचिकेसाठी २५ लाख स्वाक्षऱ्या गोळा करणे, २०२४ पर्यंत मतदारयादीमद्ये २.५ कोटी युवा मतदारांची भर घालणे आणि तळागाळाच्या पातळीवर युवकांद्वारे चालविल्या जाणाऱ्या २५ विकास प्रकल्पांना पाठबळ देणे यांचा समावेश आहे.

द बॉडी शॉप इंडियाच्या ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसेडर श्री. सानिया मल्होत्रा म्हणाल्या, “द बॉडी शॉप ज्या मूल्यांचे प्रतिनिधित्व करते ती सर्व मूल्ये एक जबाबदार कलाकार आणि नागरिक या नात्याने माझ्या मनाला गहिरी साद घालतात. विश्वासार्ह शाश्वतता आणि सौंदर्याच्या सर्वसमावेशक संकल्पनेपासून ते लैंगिक समानता आणि स्थानिक समुदायांना दिलेल्या पाठिंब्यापर्यंतचे प्रत्येक मूल्य यात समाविष्ट आहे. त्यातही व्हाय२५ या कार्यक्रमाला माझ्या दृष्टीने खास अर्थ आहे, कारण तरुणांना – विशेषत: तरुण स्त्रियांना पुढे येत आपले म्हणणे उघडपणे मांडण्याची आणि आपला आवाज लोकांपर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा द्यावी या माझ्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षेशी तो मिळताजुळता आहे. आम्हा तरुणांच्या हाती जेव्हा जबाबदारी आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याची क्षमता दिली जाते तेव्हा आम्ही तिचा अधिक चांगल्या पद्धतीने वापर करू शकतो असे मला ठामपणे वाटते.”

द बॉडी शॉप इंडियाच्या सीईओ श्रीम. श्रुती मल्होत्रा सांगतात, “आज आपल्या पृथ्वीसमोर आणि तिच्यावर नांदणाऱ्या माणसांसमोरील सर्वात बिकट समस्यांचा सर्वाधिक परिणाम येणाऱ्या पिढीवर होणार आहे हे नाकारून चालणार नाही. आपले हवामान, आपले समुदाय आणि देश या गोष्टी आपल्या तरुणांना वारसा म्हणून मिळणार आहेत आणि म्हणूनच सार्वजनिक आयुष्यामध्ये तरुणांचा आवाज बुलंदपणे ऐकू येण्यासाठी प्रयत्न करणे हीच सर्व अर्थांनी योग्य गोष्ट आहे असा आमचा विश्वास आहे. आपल्या सर्वांसाठी एक अधिक समावेशक, अनुकंपेने भरलेले आणि समन्यायी जग तयार करायचे असेल तर हेतूपूर्ण, जबाबदार तरुण समाजाचे सक्षमीकरण हे त्यादृष्टीने दूरगामी परिणाम करणारे ठरणार आहे याबद्दल आम्हाला वाटणारी खात्री व्हाय२५ च्या मुळाशी आहे. आपला युवावर्ग उपलब्ध संसाधनांचा हुशारीने वापर करणारा आहे, आपल्या कामाप्रती कटिबद्ध आहे आणि सार्वजनिक आयुष्यामध्ये आपला आवाज ऐकू जाण्याची वाट तो पाहत आहे.”


Back to top button
Don`t copy text!