दैनिक स्थैर्य । दि. १८ जुलै २०२२ । मुंबई । नर्चर. फार्म (nurture.farm) या भारतातील आघाडीच्या कृषीतंत्रज्ञान स्टार्टअपने त्यांचे नर्चर.फार्म अॅप वापरणा-या १.९ दशलक्ष शेतक-यांसाठी त्यांची विमा सोल्यूशन्स वाढवण्याकरिता एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीसोबत सहयोगाची घोषणा केली.
नर्चर.फार्म हे उत्पादक, शेतकरी समुदाय व अन्न यंत्रणांसाठी खुले डिजिटल व्यासपीठ आहे. हे व्यासपीठ कृषी उत्पादने प्रबळ करण्यासाठी, त्यांना भावी पिढ्यांसाठी अधिक लाभदायी व स्थिर करण्याच्या मिशनवर सक्रियपणे काम करत आहे. कंपनीला नुकतेच भरतातील इन्शुरन्स रेगुलेटरी अॅण्ड डेव्हलपमेंट ऑथोरिटी (आयआरडीए)कडून कॉर्पोरेट एजन्सी परवाना मिळाला. हा परवाना नर्चर.फार्मला शेतक-यांना किफातयशीर दरांमध्ये नवोन्मेष्कारी विमा सोल्यूशन्स मिळण्यास मदत करण्यामध्ये सक्षम करतो.
नर्चर.फार्मचे व्यवसाय प्रमुख व सीओओ श्री. ध्रुव सोहनी म्हणाले, “भारतात, विशेषत: ग्रामीण भागात विम्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. आमचा शेतक-यांची आर्थिक स्थिरता वाढवण्यासाठी त्यांच्याकरिता स्मार्ट विमा सोल्यूशन्स विकसित करण्याचा प्रयत्न आहे. आम्हाला एसबीआय जनरल इन्शुरन्स आणि फ्यूचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनी यांसारख्या विश्वसनीय ब्रॅण्ड्ससोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग आमच्या मार्गातील अत्यंत लक्षणीय पाऊल आहे, जे आम्हाला आमच्या १.९ दशलक्ष शेतक-यांच्या वाढत्या समुदायासाठी निष्पत्ती व स्थिरता सुधारणारे एक-थांबा गंतव्य बनण्याचे आमचे उद्दिष्ट संपादित करण्यामध्ये मदत करेल.”
या सहयोगांसह नर्चर.फार्मचा २०२२-२३ मध्ये २ दशलक्ष शेतक-यांना त्यांचे विमा सोल्यूशन्स देण्याचा मनसुबा आहे आणि शेतक-यांना जोखीम कमी करणारे सोल्यूशन्स देण्यासाठी सतत नाविन्यता आणत राहिल. नर्चर.फार्मचा शेतक-यांना रिमोट सेन्सिंगवर आधारित कृषी स्तरीय विमा देण्याचा मानस आहे, ज्याचा भारतातील शेतक-यांची स्थिरता वाढवण्यामध्ये अभाव दिसून येत आहे.
एसबीआय जनरल इन्शुरन्सच्या इमर्जिंग बिझनेस लाइन्स, रूरल अॅण्ड अॅग्रीच्या प्रमुख श्रीम. प्रिया कुमार म्हणाल्या, “एसबीआय जनरलमध्ये आम्ही सानुकूल विमा सोल्यूशन्स विकसित करण्यासाठी मागील काही वर्षांपासून कृषी समुदायासोबत सहयोगाने काम करत आलो आहोत. आम्हाला नर्चर.फार्म सोबत सहयोग करण्याचा आनंद होत आहे. हा सहयोग शेतक-यांना तंत्रज्ञान सक्षम व्यासपीठासह पाठिंबा व संरक्षण देण्याच्या आमच्या प्रयत्नाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. नर्चर.फार्म सोबतचा हा सहयोग देशाच्या कानाकोप-यामधील शेतक-यांना संरक्षण देण्याप्रती आमची कटिबद्धता अधिक दृढ करेल. आमचा सहयोग विम्याबाबत जागरूकता वाढवण्याला चालना देईल आणि विमा क्षेत्रामध्ये अधिकाधिक शेतक-यांना आणेल, ज्यामुळे अनिश्चित स्थितींमध्ये उद्भवणा-या आर्थिक तणावापासून त्यांचे संरक्षण होईल.”
फ्युचर जनरली इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या क्रॉप इन्शुरन्स अॅण्ड रूरल अंडररायटिंगचे उपाध्यक्ष श्री. समदर्शी विक्रम सिंग म्हणाले, “आम्हाला नर्चर.फार्म सोबतच्या आमच्या सहयोगाबाबत आनंद होत आहे. आम्ही भारतीय कृषी समुदायाला विमा उत्पादनांसह सेवा देण्यास उत्सुक आहोत, जी त्यांना सामना कराव्या लागू शकणा-या कोण-याही आर्थिक आपत्तीमध्ये जलद रिकव्हरी देण्याची खात्री देतात. हा प्रयत्न देशातील, विशेषत: अजूनही सुरूवातीच्या टप्प्यामध्ये पोहोच असलेल्या ग्रामीण भागांमधील विमा प्रवेश सुधारण्यास मदत करेल. नर्चर.फार्म सारखे आधुनिक कृषीतंत्रज्ञान सहयोगी खात्री घेतील की, शेतक-यांचा विश्वास असलेल्या विश्वसनीय स्रोताच्या माध्यमातून शेतक-यांपर्यंत पोहोचणारे विमा विश्वसनीय व पारदर्शक असतील.”