कृषीकन्यांकडून सीमेवरील जवानांसाठी राख्या बनवण्याचा उपक्रम


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑगस्ट २०२३ | फलटण |
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील कृषीकन्यांनी मठाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेतील विद्यार्थ्यांकडून रक्षाबंधननिमित्त राख्या आणि शुभेच्छा देणारे कार्ड्स बनवून घेतले. या राख्या आणि कार्ड सीमेवरील जवानांसाठी पाठवण्यात आलेल्या असून यावेळी लहान मुलांनी आणि कृषिकन्यांनी सीमेवरील जवानांसाठी आपल्या मनात असणारे प्रेम व आदरभाव व्यक्त केले. यासाठी लहान मुलांनी देखील खूप चांगला व उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शवला.

या कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मठाचीवाडीचे मुख्याध्यापक श्री. अंकुश शिंदे सर व त्यांचा संपूर्ण स्टाफ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पडला.

कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी. चव्हाण सर, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलीमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे व प्रा. नितिषा पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या समृद्धी मोहिते, प्राजक्ता ननावरे, पूजा मारवाडी, साक्षी शिंदे, समृद्धी उल्हारे, हर्षदा लोखंडे, शिवांजली धुमाळ व समृद्धी कुंजीर यांच्यातर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!