

स्थैर्य, सातारा दि. 1 : सातारा जिल्ह्यातील विविध कोरोना केअर सेंटर, उपजिल्हा रुग्णालय येथे अनुमानित म्हणून भरती असलेल्या 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
यामध्ये कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 19 वर्षीय तरुण, 9 वर्षीय बालक, 70 व 71 वर्षीय महिला.
पाटण तालुक्यातील जांभेकर वाडी येथील 22 वर्षीय तरुण.
वाई तालुक्यातील दह्याट येथील 45 वर्षीय पुरुष.
महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड येथील 62 व 39 वर्षीय महिला व 12 वर्षीय मुलगी. हरचंदी येथील 36 वर्षीय पुरुष.
जावळी तालुक्यातील आंबेघर येथील 59 वर्षीय पुरुष व रांजणी येथील 85 वर्षीय महिला.
खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 30 वर्षीय पुरुष
माण तालुक्यातील पिंपरी येथील 28, 58 व 70 वर्षीय पुरुष.
सातारा तालुक्यातील कुस (बु) येथील एक महिला व एक पुरुष.

