खोपोली येथील कंपनीत स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी


स्थैर्य, खोपोली, दि. १३ : खोपोली शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या इंडिया स्टील कारखान्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या भीषण स्फोटात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, एक जखमी झाला आहे. जखमी कामगाराला रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. कच्चे लोखंड भट्टीत वितळवून टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्यात मृत्यू झालेल्या कामगारांच्या शरीराचे तुकडे झाले आहेत. दिनेश वामनराव चव्हाण (वय ५५) व प्रमोद दूधनाथ शर्मा (३०) अशी मृत कामगारांची नावे आहेत. तर, सुभाष धोंडीबा वांजळे (वय ५५) असं जखमी कामगाराचं नाव आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!