दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑगस्ट २०२३ | सातारा |
नेचर अॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी, फलटण यांच्यातर्फे फलटण व आसपासच्या परिसरातील नागरिकांना नागपंचमी सणासाठी आवाहन करण्यात आले आहे की, नागपंचमी सण फलटण तालुका व आसपासच्या परिसरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी काही हौसी लोक चायनीज मांजावर बंदी असतानादेखील चायनीज मांजा व नॉयनॉलच्या धाग्याचा वापर करून पतंग उडवताना दिसतात. या चायनीज मांजामुळे काही वर्षांपासून अनेक पशूपक्षी व माणसांना आपला जीव गमवावा लागला आहे. तसेच काही पशू, पक्षी, प्राण्यांसह माणसांना गंभीर इजा होऊन कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे वरील विषयाचे गांभीर्य ओळखून चायनीज व नॉयलॉनमुकत नागपंचमी सण साजरा करूया, असे म्हटले आहे.
दरम्यान, आवाहन करूनही कोणी चायनीज किंवा नॉयलॉनच्या मांजाचा वापर किंवा विक्री केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.