दुर्गम जव्हार वाडा तालुक्यात वार्षिक क्रिडा स्पर्धा


दैनिक स्थैर्य । दि. २५ जानेवारी २०२३ । जव्हार । जव्हार वाडा तालुक्यातील दुर्गम भागात कार्य करणाऱ्या आई अमृत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेच्या वतीने वार्षिक क्रीडा व बौद्धिक स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ कंळबई शाळेच्या भव्य पटांगणात पार पडला या प्रसंगी राष्ट्रकूटचे संपादक पत्रकार राजन देसाई, ख्यातनाम शरीरसौष्ठवपटू श्री हेमचंद्र तथा पपी पाटील, आई अमृत फाउंडेशन चे प्रमुख मनोज घरत, रवी परब, सौ संध्या घरत मुख्याध्यापक श्री पाटील सर उपस्थित होते. यावेळी फाउंडेशनच्या वतीने विजेत्यांना पारितोषिके तसेच खेळाचे साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख अतिथीनी विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आरोग्य याचे महत्त्व विशद केले. हा कार्यक्रम संपन्न होण्यासाठी फाउंडेशनचे प्रमुख श्री मनोज घरत यांनी विशेष परिश्रम घेतले. या फाउंडेशन तर्फे वृध्दाश्रम देखील चालवला जातो हे स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!