फलटण शहराच्या विकासासाठी अमृत २ योजनेतून कोट्यवधींचा निधी मिळणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ३१ जुलै २०२४ | फलटण |
फलटण शहराच्या विकासासाठी केंद्रीय शहर विकास अमृत २ योजनेतून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळणार आहे, अशी माहिती एका पत्रकाद्वारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सोमवारी दिल्ली येथे शहर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यापूर्वी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व त्यावेळेचे केंद्रीय शहर विकास मंत्री हरजित सिंग पुरी यांना पत्राद्वारे माढा लोकसभा मतदारसंघातील फलटण व पंढरपूर या शहरांचा केंद्र शासनाच्या अमृत २ या योजनेंत समावेश व्हावा व या शहराचा विकास करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, ही मागणी केली होती. याबाबत बजेटमध्ये याची दखल घेऊन फलटण व पंढरपूर या शहरांचा समावेश अमृत २ या योजनेमध्ये झाला आहे. हे फलटण व पंढरपूर शहराच्या द़ृष्टीने आनंदाची बातमी आहे, असे माजी खासदार रणजितसिंह यांनी सांगितले.

या योजनेसाठी महाराष्ट्राला ३१ हजार ७२२ कोटी रुपये मंजूर झाले असून या योजनेच्या अंतर्गत फलटण व पंढरपूर शहराचा २० वर्षांपुढील पूर्ण डीपी प्लॅन तयार होणार आहे. शहराची वाढती लोकसंख्या विचारात घेऊन शहराला पुरेल एवढे पाणी कसे उपलब्ध होईल, त्यासाठी लागणारे पाण्याचे नियोजन व वितरणव्यवस्था, त्यासाठी टाक्या, पाईपलाईन, प्रत्येक घरात नळकनेक्शन, त्याच्यामध्ये शहराला पुरेल एवढा पाण्याचा बॅलन्स टँक, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज व्यवस्था, अंतर्गत पूर्ण पाईपलाईन, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी लागणारे प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया करून शहरातील झाडे जगविण्यासाठी योजना, जनतेला पाण्याचे महत्त्व समजण्यासाठी जनजागृती, त्यासाठी शिक्षाणाची गरज या गोष्टी होणार आहेत.

या योजनेतून स्वच्छ व शुद्ध पाणी लोकांना मिळणार आहे. यामुळे फलटण शहराचा कायापालट होणार आहे, असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!