
स्थैर्य, सातारा, दि. 26 सप्टेंबर : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी म्हणजेच अमृत या संस्थेमार्फत राबविल्या जाणार्या शासकीय योजनांचा लाभ अमृतच्या लक्षीत गटातील व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने दि. 27 सप्टेंबर, शनिवार रोजी दुपारी 4 वाजता शाहू कला मंदिर, येथे भव्य महामेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्यात प्रमुख उपस्थिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांची असून अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी सर मार्गदर्शन करणार आहेत. खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही प्रकारचा शासकीय लाभ नाही (उदा. ब्राह्मण, राजपूत, अग्रवाल, माहेश्वरी, पटेल, राजपुरोहित, सिंधी व इतर) अशा समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी अमृत संस्थेच्या मार्फत समाजाच्या उन्नतीसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी शासकीय योजना राबविल्या जातात. यामध्ये स्वयंरोजगार प्रशिक्षण,
वैयक्तिक व्याज परतावा, अमृत कलश, कृषी उद्योग प्रशिक्षण अशा विविध योजनांचा समावेश आहे. या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठीची नोंदणी लाभार्थ्यांनी करावी हा उद्देश या मेळाव्याचा असणार आहे. या मेळाव्यात अमृतच्या लक्षित गटातील सर्व मान्यवर, उद्योजक, विद्यार्थी व समाजातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून संस्थेच्या शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन अमृतचे विभागीय उपव्यवस्थापक प्रथमेश कुलकर्णी आणि जिल्हा व्यवस्थापक विनायक पाठकजी यांनी केले आहे