
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : सातारा नगरपालिका निवडणुकांमध्ये राजकीय घडामोडींना मोठा वेग आला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे कट्टर समर्थक अमोल मोहिते यांची नगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
मनोमिलनातील चर्चेनंतर अनेक नावांची चर्चा होती… मात्र अखेर सर्वसमावेशक नेतृत्व, कार्यकर्त्यांचा उत्साह आणि प्रभागातील मजबूत जनाधार याच्या बळावर अमोल मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. कार्यकर्त्यांमध्ये यानंतर जोरदार जल्लोष पाहायला मिळाला असून राजेंचा माणूस… मोहिते नगराध्यक्ष ! याप्रकारचे घोषवाक्य सुरू झाले आहेत. अमोल मोहिते यांनीही प्रतिक्रियेत सांगितलं शिवेंद्रसिंहराजेंच्या मार्गदर्शनाखाली सातार्याच्या विकासाचा वेग वाढवण्यासाठी मी पूर्ण ताकदीने मैदानात उतरेल.
नगरपालिका निवडणुकीत आता अमोल मोहिते यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सातार्यातील राजकीय समीकरणे कशी बदलतील? कोणता फ्रंट मोहितेंच्या विरोधात उभा राहील? आणि विकासाचा मुद्दा किती प्रभावी ठरेल? हे पाहणं आगामी दिवसांत अत्यंत महत्वाचं ठरणार आहे.

