अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण, नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार


स्थैर्य, मुंबई, दि. १२ : अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनीच त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून यासंदर्भात माहिती दिली.

महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून आज सायंकाळी मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे. याबाबत खुद्द अमिताभ बच्चन यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे.

त्याचसोबत, जे कुणी गेल्या 10 दिवसात माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कोरोनाची चाचणी करावी, अशी विनंतीही अमिताभ बच्चन यांनी केली आहे.

अमिताभ बच्चन यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर आपण रुग्णालयात दाखल झालो आहे, असे अमिताभ यांनी नमूद केले आहे. नानावटी रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!