दैनिक स्थैर्य । दि. १३ डिसेंबर २०२२ । बारामती । कामापुरता सोशल मीडियाचा वापर करून, वेळेचे योग्य नियोजन व ध्येय डोळ्यासमोर ठेवून जिद्द चिकाटी आत्मविश्वास आणि बौद्धिक क्षमता आणि मैदानातील सरावाच्या जोरावर यश नक्की मिळू शकते असे प्रतिपादन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झालेले अमित शिंदे यांनी केले.
तांदुळवाडी दादा पाटील नगर व शिर्सुफळ रहिवासी संघाच्या वतीने पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अमित शरद शिंदे यांच्या सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी शिंदे बोलत होते.
या प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ, कॉटन किंग चे जनरल मॅनेजर खंडू गायकवाड, नगरसेविका ज्योतीताई सरोदे,
वनाधिकारी बाळासो गोलांडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अजित कांबळे, राजकिरण शिंदे,दीपक कांबळे, शरद शिंदे, पोलीस कर्मचारी किशोर गायकवाड, सुवर्णा साळवे आदी मान्यवर उपस्तित होते.
सर्वसामान्य परिस्थिती असताना सुद्धा परिस्थितीशी संघर्ष करत शिंदे यांनी मिळवलेले यश कौतुकास्पद आणि आदर्शवत असून आई वडिलांनी दिलेली साथ लाख मोलाची असल्याचे खंडू गायकवाड यांनी सांगितले तर तरुणांनी शिंदे यांचा आदर्श घेऊन स्पर्धा परीक्षा साठी वाहून घेतले तर यश मिळणार असल्याचे माजी उपनगराध्यक्ष नवनाथ बल्लाळ यांनी सांगितले. या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. अजित कांबळे व दीपक कांबळे यांनी उप्स्तीतचे स्वागत केले. आभार महेश अहिवळे यांनी मानले.