स्थैर्य, मुंबई, दि.०८: भारतातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवा वाढवण्याच्या सामाजिक उपक्रमाचा भाग म्हणून, क्लिक हिल फाउंडेशन या क्विक हिल टेक्नोलॉजीजच्या सीएसआर शाखेने, पनवेल येथील आरएसएस जनकल्याण समितीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. तसेच, याच्या ‘आरोग्य यान’ उपक्रमाअंतर्गत, क्विक हिलने रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकांना चांगल्या आरोग्य सेवा पुरवण्याकरिता अगदी नवी अॅम्ब्युलन्स दान केली. आरएसएस जनकल्याण समिती या भागातील वंचित लोकांकरिता आरोग्य सेवा पुरवते तसेच नियमित आरोग्य तपासणीच्या योजना राबवते.
क्विक हिल टेक्नोलॉजीजचे एमडी आणि सीईओ श्री कैलाश काटकर, क्विक हिलच्या सीएसआर अॅक्टिव्हिटी आणि आरोग्य यानामागील प्रणेत्या सौ अनुपमा काटकर आणि श्री विठ्ठल डाके (डेप्यु. कमिशनर पनवेल पीएमसी), श्री धैर्यशील जाधव (असिस्टंट कमिशनर पनवेल पीएमसी), आरएसएस जनकल्याण समिती, महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर आणि उपाध्यक्ष श्री विनायक दंभीर यांच्या उपस्थितीत या दानाचा कार्यक्रम पार पडला.
क्विक हिलचे अत्याधुनिक ‘आरोग्य यान’ रायगड जिल्ह्यातील आदिवासी भागातील लोकांना सेवा देईल. यात सर्व खेडी आणि नेरा, तोवेर वाडी, दोधानी, सतीची वाडी, तामसाई, वाघाची वाडी, रानसाई, धामानी, मालडुंगेस सावनसाई, चिंचवली आणि गोडेश्वर आदींचा समावेश आहे. अति दुर्गम भागातील डॉक्टर आणि रुग्णांना प्रवासाकरिता ही उपयुक्त ठरेल. तसेच रायगड जिल्ह्यातील आदिवासी लोकांना नियमित तपासणी, निदान आणि उपचार यांसारख्या आरोग्य सेवा पुरवल्या जातील. तसेच ही रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेकरिता मोबाइल क्लिनिक युनिटमध्ये रुपांतरीत करता येते. यात स्वच्छ आणि आरोग्यदायी सेटिंग तसेच औषध वितरण आणि साठवणीकरिता मोठा प्लॅटफॉर्मही तयार होऊ शकतो.
क्विक हिल टेक्नोलॉजी लिमिटेडचे एमडी आणि सीईओ डॉ. कैलाश काटकर म्हणाले, “क्विक हिल टेक्नोलॉजीमध्ये आम्ही अनेक समाजोपयोगी उपक्रमांद्वारे सामाजिक उत्तरदायित्व बजावतो. रायगड जिल्ह्यातील वंचित लोकांची वृद्धी आणि विकासाकरिता आरएसएस जनकल्याण समितीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. रुग्णवाहिकेमुळे या लोकांना वेळेवर मोफत आरोग्य सेवा पुरवण्यात तसेच इतर आरोग्यविषयक सेवांकरिता मदत होईल. दुर्गम भागात, जिथे मूलभूत आरोग्य सुविधांची कमतरता आहे, तिथे लोकांच्या कल्याणाकरिता आम्ही असे योगदान करतच राहू.”