स्थैर्य, फलटण : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या माध्यमातून फेब्रुवारी मार्च मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) परीक्षेत आदर्की बुद्रुक ता. फलटण येथील अँम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कूलने इयत्ता १० वी १०० टक्के निकालाची परंपरा सलग ५ व्या वर्षी कायम राखली आहे.
अँम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमधील रोशनी दिपक नलवडे ९५.४० टक्के, निशिता विकास काकडे ९४.२० टक्के, मनस्वी प्रविण शेडगे ८७.६० टक्के, पौर्णिमा धनंजय बोबडे ८४.८० टक्के तर पियुष संतोष जाधव ८३.२० टक्के गुण मिळवून स्कूलमध्ये अनुक्रमे प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
अँम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इयत्ता १० वी परिक्षेस एकूण ११ विद्यार्थी/विद्यार्थिनी बसले होते ते सर्व उत्तीर्ण झाले आहेत. या ११ पैकी ९ विद्यार्थी विशेष प्रविण्यात व दोन विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
श्री. भैरवनाथ एज्युकेशन सोसायटी संचलित अॅम्बिशन इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर काॅलेजने निकालाची परंपरा यावर्षीही कायम ठेवली असून यशस्वी विद्यार्थ्यांचे व स्कूलमधील शिक्षक व कर्मचारी यांचे राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा सरचिटणीस सुभाषराव धुमाळ, विजय पतसंस्था चेअरमन विश्वासराव धुमाळ, श्री भैैरवनाथ एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब कासार (मोहोळकर), उपाध्यक्ष आप्पासाहेब नलवडे, सचिव प्रकाश येवले, तंटामुक्त समिती अध्यक्ष गणपतराव धुमाळ, विलासराव धुमाळ यांचेसह संचालक मंडळ, प्रिन्सी्पॉल सौ. संगीता पिसाळ (देशमुख) शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.