दैनिक स्थैर्य । दि. 28 जून 2021 । वडूज । खटाव तालुक्यातील अंबवडे व सि.कुरोली येथे वडूज पोलीसांनी छापे टाकून डांबेवाडी व गोरगावच्या सरपंचासह एकुण ७ जणांवर कारवाई केली. या कारवाईमध्ये एकुण ५४ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये २ डंपर, १ जेसीबी, १ ट्रॅक्टर, १ बुलट मोटर सायकल या वाहनांचा समावेश आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वडूज पोलीस ठाण्याचे सपोनि मालोजीराव देशमुख ठाणे यांना गोपनीय बातमीदारामार्फत अंबवडे, ता. खटाव येथे बेकायदेशीर वाळू उपसा व वाहतूक चालू आहे.
त्यांनी लगेचच सहा.पोलीस देशमुख, पोहवा. दादासो देवकुळे, मुषण माने, आण्णा मारेकर, संदीप शेडगे, सत्यवान खाडे, दिपक देवकर, होमगार्ड देशमुख जाधव, पवार, बागल, कुदळे आदींची तीन पथके बनवून अंबवडेत येरळा नदीचे पात्रात येरळा डॅमचे भराव्यालगत सुरू असला वाळू उपसा चोरी करीत असताना रात्रीच्या वेळी छापा टाकला. याठिकाणी एकूण वाळूने भरलेले २ डंपर, १ जेसीबी, व एक बुलट मोटार सायकल अशी वाहने व अन्वर रशीद शेख रा. वडूज, सरपंच सुशीलकुमार दत्तात्रय डोईफोडे रा. गोरेगाव सोमनाथ आनंदराव भोसले रा. वडूज, विलास दादा सुर्वे रा. पिंपरी हे छाप्यादरम्यान मिळून आले.
त्यांच्याकडे घटनास्थळावरुन पळून गेलेल्यांची माहिती विचारता त्यांनी निलेश अशोक जाधव उर्फ कांदा रा. वडूज असे सांगितले आहे. तसेच सदरची वाळू वाहतूक ही डांबेवाडीचे सरपंच किशोर चंद्रकांत बागल यांच्या सांगण्यावरुन करीत आहोत असे सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून २ वाळूने भरलेले डंपर, १ जेसीबी, १ बुलेट मोटार सायकल व एकूण ६ ब्रास वाळू असा एकूण ५१,४६,000/-
किंमतीचा माल ताब्यात घेतला.
याप्रकरणी निलेश अशोक जाधव उर्फ कांदा रा वडूज, अन्वर रशीद शेख रा. वडूज, सोमनाथ आनंदराव भोसले रा. वडूज, सुशीलकुमार दत्तात्रय डोईफोडे रा. गोरेगांव, विलास दादा सुर्वे रा. पिंपरी, किशार चंद्रकांत बागल रा. डांबेवाडी यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून विपूल भोसले तपास करीत आहेत.
दरम्यान, सिद्धेश्वर कुरोली येथे मोडे नावचे शिवारात कॅनालजवळ ट्रॅकटरने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असताना वडूज येथील इंदापुरे याच्यावर पोलिसांनी कारवाई केली.