स्थैर्य, म्हसवड, दि. 23 : माजी विद्यार्थी संघ पळशी ता.माण मार्फत एक हजार कुटुंबाना मास्क, सॅनिटायझर व होमिओपॅथी अर्सेनिकम अल्बम-30 गोळ्यांचे वाटप आज दि.२३ मे रोजी सकाळी दहा वाजता पळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत वाटप करण्यात आल्याची माहिती माजी विद्यार्थी संघ पळशीचे सदस्य हेमंतकुमार खाडे साहेब यांनी दिली.
यावेळी गावातील गर्भवती महिलांना सुध्दा कोरोना या महाभयंकर आजारा विरुद्ध लढण्यासाठी त्यांना सुध्दा हाॅन्ड वॅश वाटप करण्यात आले, असून त्याचबरोबर गावातील ज्या लोकांना होम क्वारटांईन केले आहे ,अशा सर्व लोकांना मास्क, सॅनिटाईजर,प्रतिकार शक्ति वाढविणार्या होमिओपॅथी गोळ्याचे वाटप करण्यात आले .या कार्यक्रमासाठी सरपंच, उपसरपंच, चेअरमन, डाॅक्टर तसेच माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सदर कार्यक्रम गावातील पळशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी संघाच्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी परिश्रम घेतले.