
दैनिक स्थैर्य | दि. २० फेब्रुवारी २०२५ | फलटण |
मुधोजी महाविद्यालय फलटण येथे तब्बल ३० वर्षांनी सन १९९३–९४ बॅचच्या भूगोल विभागाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. सूर्यवंशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. डॉ. श्री. सुधीर इंगळे सर व प्राध्यापक डॉ. श्री. टी. पी. शिंदे सर, भूगोल विभागप्रमुख मुधोजी महाविद्यालय फलटण प्रा. श्री. आडके सर उपस्थित होते.
यावेळी प्रा. डॉ. श्री. के. एस. सूर्यवंशी सर व अध्यक्ष प्रा. डॉ. श्री. सुधीर इंगळे सर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच प्रा. टी. पी. शिंदे सर, प्रा. श्री. आडके सर यांचाही शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच हैदरभाई शेख, मुकेश राकेश मोरे, अर्जुन काळे यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व विद्यार्थ्यांना मुधोजी महाविद्यालयाचा ‘उदय’ हा अंक आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी सौ. सुप्रिया कुलकर्णी आणि राकेश मोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
प्रास्ताविक भूगोल विभागप्रमुख टी. पी. शिंदे सर यांनी केले. प्रास्ताविकात टी. पी. शिंदे सर यांनी कॉलेजमधल्या विविध विभागात काय बदल झाले आहेत, आत्ताचे कॉलेज आणि पूर्वीचे कॉलेज यामधील फरक सांगितला व माजी विद्यार्थ्यांना हा स्नेहमेळावा कॉलेजमध्ये घेतला, याबद्दल कौतुक केले.
यावेळी मुधोजी महाविद्यालयाची ध्वनीफीत दाखवण्यात आली.शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त करत असताना जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांनी आपला परिचय देत ते सध्या काय करत आहेत तसेच कौटुंबिक माहिती देत कॉलेजमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या यशस्वी जीवनात शिक्षकांचा मोठा वाटा असल्याचे आवर्जून सांगितले.
सौ. सुप्रिया कुलकर्णी, सौ. अरुणा भडलकर, सौ. सुप्रिया रनवरे, जबीन शेख या दूर असतानाही संसारिक प्रपंचातून वेळ काढून मेळाव्यासाठी त्यांनी विशेष उपस्थिती लावली होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. राजेंद्र गोडसे , श्री. सोमा फाळके, श्री. बाळासाहेब सस्ते, श्री. प्रदीप सस्ते, श्री. वसंतराव डांगे, श्री. संजय अहीरेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास श्री. नानासाहेब घार्गे, श्री. प्रशांत धुमाळ, श्री. प्रकाश साळवी, श्री. रवींद्र कापसे, श्री. शरद जाधव, श्री. राकेश मोरे तसेच श्री. अर्जुन काळे, श्री. हैदरभाई शेख, मुकेश मोरे हे उपस्थित होते.
श्री. रसुल महात हे ऑस्ट्रेलिया येथे गेल्याने ते स्नेहमेळाव्यास उपस्थित राहू शकले नाहीत त्यांनी दूरध्वनीद्वारे स्नेहमेळाव्यास शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन श्री. रवींद्र कापसे यांनी तर आभार श्री. सोमा फाळके यांनी मानले.