गोखळीत रंगला 14 वर्षांनतर माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 22 एप्रिल 2025। फलटण । गोखळी (ता. फलटण) येथील जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी संचलित हनुमान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये 2011-12 या शैक्षणिक वर्षात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांचे 14 वर्षांनंतर स्नेहमेळावा उत्साहात झाला.

कार्यक्रमाला चौदा वर्षांपूर्वीचे शिक्षक विद्यार्थी, विद्यार्थीनींनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक एस. ई.पिसाळ होते. यावेळी जुन्या आठवणींना उजाळा दिला. 14 वर्षांनंतर पुन्हा एकदा माजी विद्यार्थ्यांचा शाळेत वर्ग भरला. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गंमती जमती सांगितल्या. विद्यालयाविषयी, गुरुवर्याविषयी काही अनुभव व्यक्त केले. सुरुवातीला राष्ट्रगीत, प्रार्थना झाली. सुरवातीला मुल्य शिक्षणाचा तास झाला. प्रारंभी सरस्वतीच्या पूजन व दिपप्रज्वलन शिक्षकांच्या हस्ते झाले. 14 वर्षापूर्वी त्यांना असणारे शिक्षक एन.एस. निंबाळकर यांचे निधन झाले. त्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात शिक्षकांचा शाल, श्रीफळ, फेटा, रोप देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांनाही आंब्याचे रोप देण्यात आले.

गेट टुगेदर आयोजित करण्यासाठी सुमित जगताप, डॉ. प्रियांका धुमाळ, अक्षय गावडे, शेखर देवकुळे, अक्षय धुमाळ, अक्षय गावडे, रोहित नामदास यांनी परिश्रम घेतले. माजी विद्यार्थ्यांच्यावतीने ग्रंथालयासाठी कपाट भेट देण्यात आले.
माजी मुख्याध्यापक एस. ई. पिसाळ, एच. टी. निबाळकर, खापे, शेख, घाडगे सर, गायकवाड, विकास घोरपडे, बळीप, डी. एन. भिवरकर, किरण पवार, कदम, प्राचार्य सस्ते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास दत्ता चौधरी, राजेंद्र भागवत, प्रवीण निंबाळकर, रुपाली जाधव उपस्थित होते. सुमित जगताप यांनी स्वागत केले. निखिल कापले यांनी प्रास्ताविक केले. राहुल गावडे यांनी पर्यावरण विषयी जागृतीविषयी मार्गदर्शन केले


Back to top button
Don`t copy text!