दैनिक स्थैर्य । दि. २८ ऑक्टोबर २०२२ । फलटण । सास्कल तालुका फलटण येथील शिवशंकर माध्यमिक विद्यालय सासकल या ठिकाणी सन १९९६ ते २००५ या वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा कृतज्ञता सोहळा नुकताच सासकल या ठिकाणी संपन्न झाला.
यावेळी आजी-माजी विद्यार्थी व शिक्षक यांनी उपस्थिती होते. यावेळी शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य टी. ए कदम व प्राथमिक शाळा सासकलचे सेवानिवृत्त उपशिक्षक राजेंद्र आकोबा सस्ते गुरुजी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी शेडगे ए. टी, बेलदार , देशपांडे श्री.गो, आडके सर व सुतार सी. एस हे माजी शिक्षक उपस्थित होते.तसेच गायकवाड सर, धनाजी मुळीक सर, गुंजवटे सर, शिंदे सर, गोडसे सर हे ही कार्यक्रमास उपस्थित होते.
यावेळी प्रामुख्याने शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबर विद्यालयास आवश्यक असणाऱ्या प्रशस्त प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक लॅब बनवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सर्व तो परिसर कार्य करण्याचा संकल्प बोलून दाखवला.
यावेळी शाळा सुधार संघटनचे प्रवर्तक राहुल साहेबराव मुळीक यांनी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले,” या विद्यालयात आम्ही शिक्षण घेतले असा मला सार्थ अभिमान आहे. परभणी जिल्हा परिषद शाळेच्या गुणवत्ता वाढीसाठी व शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नशील आहोत त्याच पद्धतीने शिवशंकर माध्यमिक विद्यालयाच्या सुद्धा भौतिक व शैक्षणिक साधनांची पूर्तता करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी मदत करू.
यावेळी बोलताना शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य टी. ए कदम सर म्हणाले,”आपण घेतलेला हा स्नेह मेळावा खऱ्या अर्थाने आम्हाला आनंद देणार आहे. इथे उपस्थित असणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांच्या आठवणी आजही आमच्या मनात ताज्या आहेत. या स्पर्धेच्या युगात तुम्ही तुमच्या हिमतीने ठामपणे उभे राहून शाळेच्या व गावच्या शैक्षणिक विकासामध्ये योगदान देत आहात हेच आमच्यासाठी खूप आहे. तुम्हाला या कामासाठी माझ्या शुभेच्छा आहेत.
“यावेळी शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे धनाजी मुळीक सर म्हणाले,” शिवशंकर माध्यमिक विद्यालय हे जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवीच्या सर्व हायस्कूलमध्ये गुणवत्तेमध्ये कायमच अव्वल स्थान पटकावत आले आहे. त्यामुळे आताचे सर्व शिक्षक वृंद व या अगोदरचे सर्व आजी-माजी प्राचार्य व शिक्षक यांच्या सर्व प्रयत्नामुळे तो वारसा समर्थपणे आम्ही चालवत आहोत. त्यामध्ये गावकऱ्यांचे चांगले सहकार्य मिळत आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन गावकरी आम्हाला मदत करत आहेत.त्यात माजी विद्यार्थ्यांचा वाटा हा मोलाचा आहे. माजी विद्यार्थी हायस्कूलच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आवश्यक असणारी शैक्षणिक साधने व भौतिक साधने उपलब्ध करून आवश्यक त्याठिकाणी मार्गदर्शन ही करत आहेत. येणाऱ्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थ्यांचा निभाव लागण्यासाठी त्यांना सर्वतोपरी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आम्ही समर्थपणे पार पाडत आहोत.
शिक्षणाशिवाय तर उपाय नाही हे आज अधोरेखित केले गेले आहे. त्यामुळे पुढे जाऊन आपले विद्यार्थी शैक्षणिक विकासात मागे पडू नयेत यासाठी आम्ही जादाची मेहनत घेत आहोत. शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षक व विद्यार्थी एवढ्या पुरतेच ते सीमित नसून त्यासोबत समाज, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, पालक, यांचाही मोलाचा वाटा आहे. तेव्हा सगळ्यांनी एकत्रित येऊन या प्रश्नावर काम केल्याशिवाय शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार नाही व गावचा नावलौकिक होणार नाही आणि त्यामुळे माजी विद्यार्थी करत असलेली मदत ही आमच्यासाठी मोलायचे आहे. यावेळी सासकल गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांनी आपल्या आठवणींना उजाळा देत आपले मनोगत व्यक्त केले.