कोरोना रुग्ण संख्या कमी झाली तरी धोका टळला नाही; काळजी घ्या, नियम पाळा : प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.२८: फलटण शहर व तालुक्यात शासकीय, खाजगी हॉस्पिटल्स आणि कोरोना केअर सेंटर्स मध्ये एकूण केवळ ७५६ सर्व प्रकारचे बेड उपलब्ध असून यापूर्वी त्या सर्व ठिकाणी पेशंट दाखल असल्याने बेड उपलब्ध होत नसत अशा परिस्थितीत दररोज ३५० ते ४०० काही वेळा त्यापेक्षा अधिक पॉझिटीव्ह रुग्ण आढळल्याचे शासकीय यंत्रणेच्या आकडेवारीवरुन दिसत असले तरी हे सर्व पॉझिटीव्ह रुग्ण उपचार कोठे घेतात हे कोडे सर्वानाच सतावत असे. त्यावर बारामती, सातारा, पुणे येथे फलटणचे रुग्ण दाखल होत असल्याचे काही जण सांगत परंतू आज प्रांताधिकऱ्यांनी त्याबाबत खुलासा केल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चाचण्या ICMR पोर्टलवर अपडेट करण्याचे काम प्रलंबीत होते, ते सध्या सुरु असल्याने पॅाझीटीव्ह व्यक्तींची संख्या १०७१ अशी दाखविली गेली आहे, मात्र प्रत्यक्ष पॅाझीटीव्ह आलेल्या व्यक्तींची संख्या केवळ १४७ असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

प्रांताधिकारी डॉ. जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील सर्व ६ प्रा. आरोग्य केंद्र, शहरातील उप जिल्हा रुग्णालय आणि बाहेर गावाहुन आलेल्या रुग्णांच्या चाचण्यामध्ये ७९ जणांच्या RTPCR, ६८ जणांच्या RAT अशा एकूण १४७ जणांच्या कोविड चाचण्या पॉझिटीव्ह आल्या आहेत. तर आतापर्यंत एकूण २१०५५ लोक पॉझिटीव्ह आले आहेत.

बरड प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR ३४ आणि RAT २ असे एकूण ३६ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण २४८६ पॉझिटीव्ह आले आहेत. बिबी प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR ० आणि RAT २० असे एकूण २० पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण १६८३ पॉझिटीव्ह आले आहेत. गिरवी प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR ५ आणि RAT १२असे एकूण १७ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण ३७३३ पॉझिटीव्ह आले आहेत. राजाळे प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR १३ आणि RAT ७ असे एकूण २० पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण २७७३ पॉझिटीव्ह आले आहेत. साखरवाडी प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR ४ आणि RAT ९ असे एकूण १३ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण २३५८ पॉझिटीव्ह आले आहेत. तरडगाव प्रा. आरोग्य केंद्रात RTPCR ११ आणि RAT १० असे एकूण २१ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण २५७८ पॉझिटीव्ह आले आहेत. उप जिल्हा रुग्णालय फलटण येथे RTPCR १२ आणि RAT ५ असे एकूण १७ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण ४८९५ पॉझिटीव्ह आले आहेत. बाहेर गावाहुन टेस्ट करुन आलेले RTPCR ० आणि RAT ३ असे एकूण ३ पॉझिटीव्ह आले असून आजअखेर एकूण ५४९ पॉझिटीव्ह आले आहेत.

फलटण शहर व तालुक्यातील खाजगी व शासकीय रुग्णालये, कोरोना केअर सेंटर मध्ये एकूण ७५६ बेडस असून त्यापैकी ३७१ रिक्त आहेत. रिक्त असलेल्या बेडमध्ये व्हेंटीलेटरचे ८, आयसीयू मधील ७९, ऑक्सिजनचे १०० आणि जनरल २२७ असे एकूण ३७१ बेड आज उपलब्ध आहेत.

कोरोना बाधीतांचा आजचा आकडा फक्त १४७ आहे आणि ३७१ बेड उपलब्ध आहेत, ही वस्तुस्थिती असली तरी लगेच सगळ्यांनी बाहेर पडून पूर्ववत वागण्यासारखी परिस्थिती निश्चित नाही याचे भान ठेवून सर्वांनी प्रशासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे, लॉक डाऊनचे सर्व निर्बंधांचे काटेकोर पालन करावे तरच तालुका कोरोना मुक्त करणे शक्य होणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी. तसेच कोरोना तिसऱ्या लाटेचा आणि म्युकर मायोसिस या भीषण आजाराचा धोका अद्याप टळलेला नाही, तसेच आजही कोरोना १४७ बाधीत रुग्ण आढळले आहेत हे कोणालाही विसरता येणार नाही.

घरातच रहा, मास्क, सॅनिटायझर वापरा, बाहेर पडू नका धोका अद्याप टळलेला नाही.


Back to top button
Don`t copy text!