पाडेगाव ते आसू पर्यायी रस्ता, जाधववस्ती लगत नाबार्ड मधून मोठा पूल यासह साठे येथे विकास कामांची रेलचेल : सुमारे ४ कोटींची कामे मंजूर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ३१ ऑक्टोबर २०२१ | गोखळी | पाडेगाव ते आसू या आळंदी – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर, दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त आणि सर्वात महत्त्वाच्या रस्त्याकडे कोणाचे फारसे लक्ष नव्हते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सत्तेत आल्यापासून या रस्त्याचे महत्व ओळखले आणि स्वतः लक्ष घालुन हा रस्ता टप्प्या टप्प्याने तयार करीत आत्ता जवळपास आसू पर्यंत पूर्णत्वाकडे नेला आहे, साठे गावाजवळ थोडी अडचण आहे ती लवकरच दूर केली जाईल, त्यानंतर हा उत्तम पर्यायी रस्ता होणार असून या भागातून पुणे, नीरा, साखरवाडीशी जवळून संपर्क निर्माण होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र खो – खो असोसिएशनचे अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

साठे, ता. फलटण येथे विविध विकास कामांची उद्घाटने, भूमीपूजने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आ. दीपकराव चव्हाण होते. यावेळी पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर, जिल्हा परिषद सदस्या सौ. उषादेवी गावडे, पंचायत समिती सदस्य संजय कापसे, श्रीराम कारखान्याचे संचालक संतोष खटके, संचालक तानाजी गावडे पाटील, श्रीराम कारखान्याच्या संचालिका सौ. आशाताई गावडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
विकास कामे होत असताना शेजारच्या तालुक्याशी तुलना केली जाते, येथे पवार साहेब केवळ बारामतीच्या विकासावर लक्ष न देता संपूर्ण महाराष्ट्रभर विकास कामाकडे त्यांचे लक्ष असते, फलटणला भरपूर निधी देण्याकडे त्यांचा कल असल्याचे स्पष्ट करीत अजितदादा पवार यांच्या माध्यमातून मिळालेल्या भरपूर निधी मुळेच आपल्या भागाचा विकास साधता येत असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी निदर्शनास आणून दिले.

प्रत्येक वर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात धरणातून निरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावांना पुराची झळ पोहोचते, साठे गावानजीक जाधव वस्तीचा नेहमीच पुराच्या पाण्याने संपर्क तुटतो त्यामुळे जाधव वस्तीचे बेटा मध्ये रुपांतर होते, तेथील लोक, जनावरे संपूर्ण वस्ती पाण्याने वेढली जात असल्याने त्यातून कायमचा सुरक्षीत मार्ग काढण्यासाठी या वस्तीला जोडणारा पुल बांधण्यात यावा अशी अनेक वर्षापासून मागणी होती, श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून नाबार्ड निधीतून सुमारे दीड कोटी खर्च करुन पुल बांधण्यात आल्याने जाधव वस्तीचा प्रश्न कायमस्वरुपी मिटला आहे, साठे फाटा ते साठे गाव रस्ता आ. दिपकराव चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आला असल्याचे श्रीमंत संजीवराजे यांनी सांगितले.

यावेळी आ. दीपकराव चव्हाण म्हणाले, कोरोना ाथीच्या पार्श्‍वभूमीवर दीड दोन वर्षातून समारंभ होत आहे तुम्हाला आम्हाला भेटण्याची इच्छा होती आम्हाला तुम्हाला भेटण्याची इच्छा होती परंतु कोरोना साथीमुळे ते शक्य झाले नाही साठे गावासाठी जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी दुरुस्तीच्या कामाबरोबरच जल जीवन मिशन च्या माध्यमातून जिल्ह्यात कोठेही झाली नसतील एवढी कामे आपल्या तालुक्यात मंजूर झाले आहेत भविष्यात तालुक्यातील एकही गाव पाण्यापासून वंचित राहणार नाही असे सांगितले. यावेळी सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर म्हणाले विकास कामांच्या माध्यमातून छोट्या छोट्या गावात 3 कोटी,4कोटी,5 कोटीची कामे सुर आहेत मंजूर झाले आहेत मात्र यापूर्वी दहा वीस तीस लाख रुपयांची कामे मंजूर झाली तरी आपण खुश असायचो परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि गटाच्या मागे खंबीरपणे ताकद उभी केली त्याची परतफेड म्हणून आपल्या भागात विकास कामे येवू लागली, आसू पासून पाडेगाव पर्यंत प्रत्येक गावामध्ये विकास कामे सुरू असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले ग्रामपंचायत, पंचायत समिती, आमदारकी, आणि मंत्री ही विकासाची साखळी निर्माण झाली पाहिजे या साखळीमध्ये कोठे खंड पडला नाही तर विकासाची गंगा गावात पोचायला वेळ लागत नाही . संतोष खटके यांची समयोचित भाषणे झाली.

ग्रामपंचायत साठे यांचेवतीने गावातील विविध विकास कामांचे भूमीपूजने व उद्घाटने करण्यात आली, त्यामध्ये पाण्याची टाकी पाईप लाईन दुरुस्ती २४ लाख ९० हजार रुपये, अंगणवाडी इमारत ८ लाख ५० हजार रुपये, प्रा. शाळा खोली बांधकाम ८ लाख ९६ हजार रुपये, सभामंडप साठे फाटा ७ लाखरुपये, इंगळे ते रणदिवे वस्ती रस्ता ४ लाख रुपये, माने ते मोरे वस्ती रस्ता ६ लाख (आमदार फंड), जाधववस्ती ओढ्यावर पूल बांधणे (१ कोटी १५ लक्ष रुपये,नाबार्ड), मुख्यमंत्री सडक योजना रस्ता १ कोटी ४५ लाख ७८ हजार ०३५ रुपये, ग्रामपंचायत कार्यालय १० लाख रुपये आदी कामांचा समावेश होता.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळावर श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल साठे ग्रामस्थांच्या वतीने श्रीमंत शिवरुपराजे यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कोरोना साथीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता धाडसाने कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करुन त्यांना आधार, धीर देऊन त्यांच्यावर औषध उपचारासाठी रात्रंदिवस काम करणारे आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स, अंगणवाडी कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा कोरोना योध्दा म्हणून श्रीमंत संजीवराजे, आ. दीपकराव चव्हाण, सभापती श्रीमंत शिवरुपराजे निंबाळकर खर्डेकर यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यामध्ये अलका शिंदे, ज्योती वायाळ, कविता मोरे, रेखा मिंड, निवेदिता शिंदे, मेटकरी मॅडम, जगताप मॅडम, घोडके मॅडम, तसेच कोरोना विलिनीकरण कक्षासाठी स्वमालकीचे मंगल कार्यालय मोफत दिल्याबद्दल माजी सैनिक फौजी दत्तात्रय शेंडे, पोलीस पाटील विकास काकडे, ग्रामसेवक हनुमंत कदम यांचा सन्मान करण्यात आला.

नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल मिंडवस्ती प्रा. शाळेतील कु. अनुक्षा धायगुडे, वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या पूजा गावडे, तेजश्री चव्हाण या विद्यार्थिनींचा आ. दीपकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मनोहर माने व फलटण तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संजय भोसले यांचा श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास विश्वासदादा गावडे, सरपंच सौ. शर्मिलाताई मनोहर माने, उपसरपंच आण्णासाहेब मिड, सदस्य विठ्ठल कदम, ज्योती धायगुडे, नीलम खांडेकर, टाकळवाडेचे सरपंच राहुल इवरे, आप्पासाहेब मिंड, ज्ञानेश्वर मिड, महादेव इवरे, संजय भोसले, दादासाहेब खटके, रघुनाथ ढोबळे, आबासाहेब मदने, मनोहर माने, युवराज मिंड, रुपेश मिंड, महादेव इवरे, भिमराव माळी, बाबासाहेब धायगुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर रुपेश पाटील यांनी प्रास्तविकात कार्यक्रमाविषयी सविस्तर विवेचन केले, राजेश बोराटे यांनी सूत्र संचालन, विठ्ठल कदम यांनी समारोप व आभार प्रदर्शन केले.


Back to top button
Don`t copy text!