दादा समवेत ‘वहिनी’ ची सुद्धा दमदार एन्ट्री


दैनिक स्थैर्य । दि. ०६ जुलै २०२३ । बारामती । राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काका पुतण्याची लढाई चालू असताना बारामती मध्ये मात्र फ्लेक्स वॉर दिसत आहे. आता पर्यंत प्रत्येक कार्यक्रम किंवा वाढदिवस निमित्त शहरात लावलेल्या प्रत्येक फ्लेक्स वर किंवा जाहिरती वर शरद पवार , सुप्रिया सुळे अजित पवार यांचे फोटो होते परंतु जसे सत्ता नाट्य सुरू झाले तसे फ्लेक्स सुद्धा बदलले आहेत.

अजित पवार यांचे अभिनंदन करताना त्यांच्या सौभाग्यवती सुनेत्रा पवार अर्थातच वहिनी यांचे सुद्धा फ्लेक्स च्या माध्यमातून आगमन झाल्याचे दिसत आहे. बारामती शहर व तालुक्यात एन्व्हायरमेंटल फोरमच्या माध्यमातून सुनेत्रा पवार यांचे कार्य महत्त्वपूर्ण आहे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे अनेक कार्यक्रमाला त्या हजेरी लावत असतात . अर्थातच अजितदादा पवार यांच्या या बंडामागे सुनेत्रा पवार यांचाही खूप मोठा हातभार व सहकार्य आहे असा अर्थ काढला जात आहे अजित पवार यांच्या विधानसभा निवडणूक चे सर्व प्रचार कार्य वहिनी संभाळतात व या पुढेही पाहणार आहेत त्यामुळे त्यांना आदराचे स्थान आहे व त्यांचा तो मान असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.

एकूणच शरद पवार व सुप्रिया सुळे फ्लेक्स वरून गायब होऊन आता अजित पवार यांच्या समवेत सुनेत्रा वहिनी पवार यांची दमदार एन्ट्री झाल्याने असे फ्लेक्स लावल्याने चर्चेचा विषय झाला आहे.


Back to top button
Don`t copy text!