गुंतवणूकदारांकरीता शेअर्समध्ये गुंतवणूक सोपी करण्याचा उद्देश
स्थैर्य, मुंबई, 12 : सर्वात लोकप्रिय गुंतवणूक मंच असेलल्या ‘ग्रो’ (Groww) ने नव्या पिढीतील गुंतवणूकदारांसाठी शेअर गुंतवणुकीचे लोकशाहीकरण करण्याच्या उद्देशाने आता स्टॉक गुंतवणुकीत प्रवेश केला आहे. स्टॉक गुंतवणुकीची सुरुवात करून ग्रो ने वित्तीय सेवा प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आणखी एक प्रयत्न केला आहे.
ग्रोवर गुंतवणूकदार कंपनीची वित्तीय कामगिरी, शेअर होल्डिंग पॅटर्न्स, पीअर कंपॅरिझन्स इत्यादी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहू शकतील. त्यांची सर्व मालमत्ता ते सिंगल डॅशबोर्डवर पाहू शकतील तसेच रिअल टाइममध्ये त्यावर निगराणी ठेवू शकतील. यामुळे ज्यांना स्वत: गुंतवणूक करायची आहे, त्यांच्यासाठी हा मंच खूप अनुकुल आहे.
ग्रो चे सहसंस्थापक आणि सीईओ ललित केशरे म्हणाले, ‘प्रत्येकाला वित्तीय सेवेचा लाभ मिळावा तसेच त्यात पारदर्शकता असावी, यासाठी आम्ही ग्रोची सुरुवात केली. स्टॉक्सच्या लाँचिंगद्वारे आम्ही देशातील नव्या पिढीतील कोट्यवधी गुंतवणुकदारांना स्टॉक गुंतवणुकीचा अधिक आनंददायी अनुभव देण्यासाठी आम्ही खुले आहोत. स्टॉक्स आणि ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा अनेक यूझर्सनी व्यक्त केली होती. त्यामुळे आम्ही व्यासपीठावर जवळपास दोन वर्षांपासूनच काम करायला सुरुवात केली. वर्षाच्या सुरुवातीलाच आम्ही पहिल्या गुंतवणूकादारांना आमंत्रित करून टप्प्या-टप्प्याने रोल आउट सुरु केले. या आमंत्रणानंतर १ लाखांपेक्षा जास्त गुंतवणूकदारांनी स्टॉक अकाउंट्स सुरु केले आणि २० लाखांपेक्षा जास्त व्यवहारही केले. पुढील काही आठवड्यात हे व्यासपीठ सर्व यूझर्ससाठी खुला होईल.”