व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्या अथवा दहा हजाराची तातडीची मदत करा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, खंडाळा, दि. 11 : सलून व्यवसाय सुरु करण्यास परवानगी द्यावी. अथवा दहा हजार रुपयांची तातडीची मदत देण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा खंडाळ्यात झालेल्या आंदोलनात नाभिक समाजाच्यावतीने देण्यात आला.

खंडाळ्यातील प्रशासकीय इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ नाभिक समाजाच्यावतीने सोशल डिस्टंसिंग पाळत शांततेच्या मार्गाने आंदोलन पार पडले. दरम्यान सलून व्यवसाय सुरू करण्यास परवानगी मिळावी. यासह अन्य मागण्यांचे निवेदन खंडाळ्याचे तहसिलदार दशरथ काळे यांना देण्यात आले.

त्या निवेदनात म्हटले आहे की, 23 मार्चपासून सलून व्यवसाय बंद असून समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. महाराष्ट्रात लॉकडाऊनमध्ये बऱ्याच प्रमाणात सूट देत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र सलून व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली नाही. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्यावतीने 5 जुनला स्मरणपत्र देत व्यवसाय सुरू करणे अथवा आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली होती. मात्र मागणी मान्य न केल्याने राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष कल्याण दळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा, तालुकास्तरावर आंदोलन छेडण्यात आले.

यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष शंकरराव मर्दाने, ओंकार पवार, नवनाथ शिंदे, योगेश माने, संतोष आवटे, जयवंत शिर्के, ऋषिकेश पवार, राजेंद्र माने, राजेंद्र काशीद, राजेंद्र गोरे, दत्ता देवकर तसेच खंडाळ्यासह तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!