रमजान ईदच्या निमित्त दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्या; खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचना


स्थैर्य, फलटण, दि. ११: मुस्लिम बांधवांचे महत्वाचे दोन सण म्हणजे ईद उल फितर आणि ईदुज्जुह. यातला ईद उल फितर हा आनंदाने साजरा करणारा सण आहे. एकमेकांमधे बंधुभावाचे नाते स्थापीत व्हावे आणि प्रेमाने आनंदाने साजरा होणारा असा हा उत्सव आहे. दि. १४ मे २०२१ रोजी रमजान ईद हा सण आहे. तरी मुस्लिम बांधवांच्या भावनांचा विचार करून शासनाने दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी द्यावी अशी सूचना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिल्यांनतर भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने फलटणचे तहसीलदार समीर यादव यांना निवेदन देण्यात आले.

भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने सरचिटणीस अनुप शहा, रियाज इनामदार, मेहबूब मेटकरी, बबलू मोमीन, वसीम मणेर, जमशेद पठाण, मुस्ताक कोतवाल, कधीर मुजावर यांची उपस्थिती या वेळी होती.


Back to top button
Don`t copy text!