स्थैर्य, मुंबई, दि. ०५ : शासकीय सेवेतील गर्भवती आणि दुर्धर आजार असलेल्या महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थितीची सक्ती न करता त्यांना घरून काम करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस नेत्या अॅड. यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केलीय. यशोमती ठाकूर या महाराष्ट्राच्या महिला व बालविकासमंत्री आहेत.
यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय की, “रक्तदाब, मधुमेह, किडनीशी संबंधित आजार, हृदयविकार, श्वसनविकार इत्यादी आजार असलेल्या 50 वर्षांहून अधिक वयाच्या, तसेच गर्भवती महिला कर्मचाऱ्यांना करोना संसर्गाचा धोका अधिक आहे. त्यामुळे त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.”
मानवतेच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने शासकीय महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्यापासून सूट द्यावी, अशी ठाकूर यांनी पत्राद्वारे मागणी केलीय.