दैनिक स्थैर्य | दि. १५ ऑगस्ट २०२३ | फलटण |
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज दि. १५ ऑगस्ट २०२३ रोजी ढवळ (ता. फलटण) येथील स्वत:ची जागा नसणार्या पाच व पिंपरद (ता. फलटण) येथील स्वत:ची जागा नसणार्या पाच लाभार्थ्यांना शासकीय जागा मंजुरीचे आदेश उपविभागीय अधिकारी फलटण सचिन ढोले यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी फलटणचे तहसिलदार डॉ. अभिजित जाधव, गटविकास अधिकारी, नायब तहसिलदार, ग्रामसेवक, घरकुल कक्षातील कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.