‘स्वराज’ कारखान्याविरोधात रणजित कदम यांनी केलेले आरोप धादांत खोटे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२१ । फलटण । उपळवे (ता.फलटण) येथील स्वराज ग्रीन पॉवर व फ्युअल लि; या साखर कारखान्याच्या सन 2018 – 19 सालातील ऊस बिलाबाबत शिवसेनेेचे रणजित कदम यांनी पत्रकार परिषद घेवून कारखाना व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे स्पष्टीकरण कारखान्याचे मुख्य लिगर ऑफिसर अ‍ॅड.अनिलकुमार तावरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिले आहे.

स्वराज कारखान्याने सन 2018 – 19 या सालातील थकीत ऊसबिल आपल्याला राजकीय आकसापोटी दिले नसल्याचा आरोप शिवसेनेचे रणजित कदम यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेवून केला होता. या आरोपाला प्रतिउत्तरादाखल सदरचे प्रसिद्धीपत्रक देण्यात आले आहे.

या प्रसिद्धीपत्रकात अ‍ॅड.अनिलकुमार तावरे यांनी नमूद करण्यात आले आहे की, कारखान्याने गळीत हंगाम 2018-19 मध्ये गाळप केलेल्या ऊसाची एफ.आर.पी. शेतकर्‍यांना देवून त्यापेक्षा ज्यादा रक्कम अदा केलेली आहे. कारखान्याने हंगाम 2020 – 21 साठी काही शेतकर्‍यांना शेतीची मशागत, ऊस बेणे, खत व इतर शेतकामासाठी जादा रक्कम अदा केलेली आहे. संबंधीत अदा करण्यात आलेल्या रक्कमेचा व ऊस बिलाचा काही संबंध नसून, शेतकामासाठी देण्यात आलेली रक्कम कोणास द्यायची किंवा नाही हा अधिकार कारखाना व्यवस्थापनाचा आहे. याबाबत कदम हे खोटी माहिती व निवेदन देत असून खोडसाळपणे तक्रार दाखल करीत आहेत.

माढा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कारखान्याचे मार्गदर्शक आहेत; संचालक नाहीत. असे असताना कदम उच्चपदस्थांना बदनाम करुन स्वत: मोठे होण्याचा प्रयत्न करीत आहेत. खोटी बातमी व निवेदन देऊन कारखान्याचे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक नुकसान व बदनामी झाली असून कोट्यावधी रुपयांचे नुकसान होत असल्याने कायदेशीर सल्ला घेवून न्यायालयात बदनामी व नुकसानभरपाईचा दावा दाखल करण्याबाबत कारखाना व्यवस्थापन विचार करीत असल्याचेही, अ‍ॅड.अनिलकुमार तावरे यांनी प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.


Back to top button
Don`t copy text!