आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार; शिवसेनेचा फलटणमध्ये नारा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१८ नोव्हेंबर २०२१ । फलटण । सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शिवसेनेला मुद्दामून डावलले असून आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व निवडणुका या शिवसेना स्वबळावर लढणार आहे, असा दावा शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी केला.

फलटण येथील शासकीय विश्रामगृहामध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका सौ. छाया जाधव, फलटण तालुका प्रमुख प्रदीप झणझणे, स्वप्नील मुळीक, शहराध्यक्ष रणजीत कदम, सचिन बिडवे, विश्वास चव्हाण, मधुसूदन कदम, नानासाहेब भोईटे, नंदकुमार काकडे, तानाजी बर्गे, तानाजी वाघ, वैष्णव गायकवाड, आदित्य गायकवाड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.

सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाचे मंत्री, दोन आमदार व शेखर गोरे यांच्यासारखे वरिष्ठ नेते असतांना सुद्धा महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन न करता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने भारतीय जनता पार्टीशी संधान बांधून सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवसेनेला मुद्दामून डावललेले आहे. त्यामुळेच आगामी काळामध्ये पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यात होणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या शिवसेना स्वबळावर लढवणार असल्याची माहिती यावेळी शिवसेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.

सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे कामकाज तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे पक्ष संघटन मजबूत करण्याचे आदेश वरिष्ठ नेत्यांनी दिलेले आहेत. तरी आगामी काळामध्ये शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही सर्वजण कार्यरत राहणार आहोत. आगामी काही वर्षांमध्ये सातारा जिल्ह्यामध्ये भगवा फडकविण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार असल्याची ग्वाही सुद्धा घ्यावी चंद्रकांत जाधव यांनी दिली.

शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी येणारी पदाधिकारी हे सर्वसामान्य कुटुंबाचे असल्याने काही ठिकाणी मतभेद असू शकतात. परंतु सर्व मतभेद मिटवून आगामी काळामध्ये शिवसेनेचे कार्य तळागाळापर्यंत पोचविण्यासाठी फलटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यामध्ये आमचे सर्व पदाधिकारी कार्यरत राहतील, अशी खात्री आम्हाला आहे, असेही चंद्रकांत जाधव यांनी यावेळी व्यक्त केली.

फलटण तालुक्यामध्ये पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी फलटण शहरासह फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागांमध्ये विविध शाखांचे उद्घाटन लवकरच आयोजित करण्यात येणार आहे. या सोबतच फलटण तालुक्यामधील शाखांच्या उद्घाटनाला शिवसेनेमधील वरिष्ठ नेते मंडळींसह मान्यवर मंडळी सुद्धा फलटण तालुक्यामध्ये येणार असल्याची माहिती यावेळी चंद्रकांत जाधव यांनी दिली.


Back to top button
Don`t copy text!