फलटण तालुक्यातील आगामी येणाऱ्या सर्वच निवडणुका ताकतीने लढवल्या जाणार : खासदार रणजितसिंह

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि.११ : भारतीय जनता पक्षाचे काम गाव तिथे शाखा व घर तिथे भाजपचा सैनिक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण आगामी काळात करणार असून फलटण तालुक्यातील आगामी येणाऱ्या सर्वच निवडणुका ताकतीने लढवल्या जाणार आहेत. कार्यकर्त्यांच्या जीवावर मला माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये घवघवीत यश मिळालं असून माझ्या अंगावर गुलाल पडला. आगामी काळात होणाऱ्या सर्व जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल पडलेला मला पाहायचा आहे. यासाठी जनतेमध्ये जाऊन जनतेचे प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीच्या वतीने केला जाईल. तालुक्यातील जे काही उर्वरित प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून करणार आहे. तालुक्यातील प्रलंबित असणारे रेल्वेचा प्रश्न असेल, नीरा देवधरचा प्रश्न असेल, तालुक्यातील खराब झालेले रस्ते असतील, शेतकऱ्यांच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी कराव्या लागतील त्या सर्व गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्याचा मानस आहे, असे मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले. 

फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नूतन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. भारतीय जनता पक्षाच्या तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, सर्व आघाडी, मोर्चाची तालुक्यातील कार्यकारणी जाहीर करण्यात आलेल्या आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर, फलटण नगरपालिकेचे विरोधीपक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, जिल्हा सरचिटणीस भरत मुळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज कलापट, जिल्हा आघाडीचे अध्यक्ष सचिन साळुंखे, नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक अनुप शहा, नगरसेवक सचिन अहिवळे, तालुकाध्यक्ष विष्णुपंत लोखंडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या वेळी बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले कि, फलटण तालुक्यातील नूतन पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील गावागावांमध्ये जाऊन पक्ष संघटना बळकट करण्यासाठी काम करावे व आगामी काळामध्ये फलटण तालुक्यातील होणाऱ्या सर्वच सर्व निवडणुका ह्या संपूर्ण ताकदीने लढवल्या जातील. आगामी काळात फलटण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याना संपूर्ण ताकद आपल्या मार्फत दिली जैन असे आश्वासन सुद्धा खासदार निंबाळकर यांनी या वेळी दिले.

भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी बोलताना भारतीय जनता पक्षाची जिल्ह्यातील वाटचाल कशी असेल याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. फलटण तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या निवडी पाहून आपण भारावून गेलो असून मनापासून सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन केले. भारतीय जनता पक्षाकडून येणारे सर्व कार्यक्रम हे पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक भागामध्ये जाऊन करायचे आहेत. पक्ष देईल ते काम मनापासून करावे. सबका साथ सबका विकास ही पक्षाची भूमिका असल्यामुळे गरिबातल्या गरिबांच्या पर्यंत केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ जनतेला मिळाला पाहिजे, यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम केले पाहिजे अशी भावना हि भाजपा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केली.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!