
दैनिक स्थैर्य । दि. १४ नोव्हेंबर २०२२ । पुणे । महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त फुले शाहू आंबेडकर एज्युकेशनल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने 37 वा महात्मा फुले यांना अभिप्रेत असलेल्या पदधतीप्रमाणे स्त्याशोधिका अलका प्रदीप महाजन (विधवा),जळगाव आणि सत्यशोधक अनिल दत्तात्रय माळी (विधुर), सोलापूर यांचा पुनर्विवाह दि.9.11.2022 रोजी दुपारी 1.30 वाजता पुणे मोशी येथील क्लब हाऊस, द.ॲड्रेस सोसायटी मध्ये एकमेकांचे अपत्य व मान्यवरांचे साक्षीने सत्यशोधक रघुनाथ ढोक यांनी स्वतः जमवून मोफत नेहमी प्रमाणे थोर समाज सुधारक महात्मा फुले यांच्या वेशभूषेत लावला.
यावेळी सत्यशोधक चित्रपट निर्माते आप्पा बोराटे व सत्यशोधक ढोक यांचे शुभहस्ते सत्यशोधक विवाह प्रमाणपत्र आणि फुले दाम्पत्य फोटो प्रेम अलका आणि अनिल यांना भेट देऊन सन्मानीत केले.
याप्रसंगी निर्माते आप्पा बोराटे म्हणाले की आज विज्ञान युग असताना देखील सर्व समाज कर्मकांड व अंधश्रदधेतून बाहेर पडताना दिसत नाही, परंतु ढोक सर सत्यशोधक विवाहाचे माध्यमातून महाराष्ट्र व परराज्यात जावून हे कार्य करीत प्रबोधन करीत आहेत. तसेच ते फुले दाम्पत्य यांचे खरे कृतिशील पाईक आहेत. आम्ही लवकरच आपणा सर्वाचे भेटीला सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त सद्या वाचन संस्कृती लुप्त होत असल्याने व नवीन पिढीला महापूर्षाचे अलौकिक कार्य समजावे म्हणून सत्यशोधक चित्रपट आणत आहे. हा चित्रपट सर्व समाजाला एक नवीन दिशा देईल अशी आशा आहे .
सत्यशोधक ढोक म्हणाले की आर्थिक उधळपट्टी व कर्जबाजारी न होता तोच पैसा वधू वर यांच्या संसाराला उपयोगी पाडून गरजूंना शिक्षण घेण्यासाठी थोडी फार मदत करून आत्मिक, मानसिक समाधान मिळावावे . सुरवातीला अलका व अनिल यांनी भारताचे संविधान व महात्मा फुले समग्र वाडमय घेऊन फुलाच्या पायघड्यावरून आगमन करीत सामजिक क्रांतीचे जनक महात्मा फुले आणि विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला तर प्रा. सुदाम धाडगे यांनी महात्मा फुले रचित मंगलाष्टके व अखंड याचे महत्व सागून त्यांचे गायन केले आणि सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ समासेवक नवनाथ लोंढे यांनी उद्देशीका वाचन केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मान्यवरांचे हस्ते आई वडील चुलते व भाऊ आणि मित्र अजित उन्हाळे, नवनाथ लोंढे यांचा सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन सन्मान केला तर आप्पा बोराटे यांनी मोशी करांचे वतीने ढोक यांचा सन्मान केला.याप्रसंगी संस्थेतर्फे यापूर्वी 26 वा विधवा विधुर सत्यशोधक विवाह लावलेली जोडी सत्यशोधक रामचंद्र व दिपाली डोके यांचा नवनाथ लोंढे व गणेश चौधरी यांनी एकत्रित शाल पागरून पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी अक्षता म्हणून सुगंधी फुलाच्या पाकळ्या वापरण्यात आले. मोलाचे सहकार्य सौ.गीता पाटील, सुनील माळी (आर्मी) आणि क्षितिज ढोक तर गोपाळ बाविस्कर व गणेश चौधरी यांनी आभार मानले.