सातारा पालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार – उपराकार लक्ष्मण माने यांची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारा पालिकेसह जिल्हयातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढणार आहे . शिवाय राज्यात नागपूर औरंगाबाद सह प्रमुख महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी सहभागी होणार असल्याची घोषणा पद्मश्री व ज्येष्ठ साहित्यिक उपराकार लक्ष्मण माने यांनी साताऱ्यात पत्रकार परिषदेत केली .

माने पुढे म्हणाले , मी 1974 साली साताऱ्यात आलो . या शहराच्या रचना जडणघडण विकास याचा मी पंचेचाळीस वर्षाचा साक्षीदार आहे. विकासाच्या प्रक्रियेत रोजगार, पर्यटन, व्यवसाय या मुद्यांवर सातारा बराच पिछाडलेला आहे . साताऱ्यात मी मी म्हणणाऱ्या राजसत्तांनी धनदांडगे बगलबच्चे जवळ करत चाळीस वर्ष सत्ता भोगली. सातारकरांना सक्षम तिसरा पर्याय देण्यासाठी महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी सातारा पालिकेचे पन्नास जागा ताकतीने लढणार आहे. सातारा जिल्ह्यात जातीय पक्ष वगळून पुरोगामी सहविचारी पक्षांसोबत जाण्यासही आमची हरकत नाही, जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत केवळ पक्षच नव्हे तर मतदारांनाही आम्ही आमची दखल घ्यायला भाग पाडू असा ठाम विश्वास लक्ष्मण माने यांनी व्यक्त केला.

पुणे मुंबई नागपूर औरंगाबाद या मोठया महापालिका क्षेत्रातही महाराष्ट्र वंचित बहुजन आघाडी चे संघटनात्मक बांधणीचे काम सुरू झाले आहे. समाजोद्धाराचा आग्रह आणि नेतृत्वाची क्षमता हे दोन गुण असणाऱ्या पात्र उमेदवाराला आघाडीच्या वतीने तिकिट दिले जाईल. पक्षसंघटन उमेदवार मुलाखती, संवाद मेळावे, जाहीरनामा प्रकाशन, जनसंपर्क या सर्व प्रक्रिया टप्पाटप्प्याने राबविल्या जातील असे लक्ष्मण माने यांनी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!