दैनिक स्थैर्य | दि. 01 मे 2023 | कोळकी | फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी आज मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली. यामध्ये विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वात सर्व उमेदवार विजयी झाले. त्यामधील काही विरोधकांचे डिपॉझिट सुद्धा जप्त होणार आहे. हे झाल्यानंतर बाजार समितीचे माजी सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या “जय-व्हीला” या निवासस्थानवर नव्याने निवडून आलेल्या सर्व उमेदवारांनी जल्लोष करीत गुलालाची उधळण केली.
फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन संचालक मंडळाचे अभिनंदन विधानपरिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित राजे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.