सर्व सामान्य लोकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेच्या अंमलबजावणीसह सतर्कतेचा इशारा – किर्ती नलवडे (कोरेगाव, प्रांताधिकारी)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


येथील निकम बंधूंनी वडिलांच्या पुण्यतिथीचा खर्च टाळून कोरोना च्या लढ्यासाठी केली मदत…  मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी  प्रांताधिकारी यांच्याकडे केला धनादेश सुपूर्द

स्थैर्य, पिंपोडे बुद्रुक, दि. 25, (रणजित लेंभे) : कोरोना संसर्ग केव्हा थांबणार अद्याप माहिती नाहीये,परंतु त्याचा सध्या झपाट्याने होणारी वाढ आणि येत्या काही दिवसात त्याचा संसर्ग वाढण्याची शक्यता अधिक आहे. प्रशासन यांबाबत अधिक खबरदारी घेत आहे, मात्र कोरेगाव तालुक्यातील सर्वच गावांसह वाघोली, पिंपोडे बुद्रुक, सोनके ग्रामस्थांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सुचणेचे पालन करुन, कोव्हीडच्या 19 (कोरोना)च्या संसर्ग विषयी, सर्वसामान्यानी  सतर्क राहण्याबाबतचा इशारा कोरेगाव तालुक्याच्या प्रांताधिकारी किर्ती नलवडे यांनी दिला.

कोरेगाव तालुक्यातील वाघोली, पिंपोडे बुद्रुक आणि सोनके येथील कोरोना बाधित रुग्ण सापडलेच्या पार्श्वभूमीवर वाघोली आणि पिंपोडे येथील कोरोना कन्टेम झोन परिसराची पाहणी करुन, ग्रामस्थांसह प्रत्येक विभागातील प्रशासकीय यंत्रणेची खबरदारी विषयाचा आढावा व माहिती घेतली, प्रशासनाच्या अंमलबजावणीसह ग्रामस्थांनीही या कोव्हीड 19 बाबत सतर्क राहिले पाहिजे. त्याचा बाऊ न करता मास्क वापरणे, ठराविक अंतराचे पालन करणे, गर्दी न करणे, सेनेटायझरचा वापर करणे अशा सूचनेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. तसेच गावं कोरोना समितीने सुध्दा सतर्क राहिले पाहिजे असे प्रांताधिकारी यांनी सांगितले. यावेळी आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, महसूल प्रशासन व  स्थानिक समिती व कमिटीला सुध्दा महत्वाच्या सूचना केल्या. यावेळी पिंपोडे येथील सुनील निकम आणि वैभव निकम यांनी कै. ज्ञानेश्वर बाबुराव निकम या आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीचा खर्च टाळून कोरोनाच्या लढ्यासाठी मा. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वीस हजार रुपयाची मदत दिली आहे. त्याचा धनादेश प्रांताधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. यावेळी वाठार स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील घोंगडे, प्रांत कार्यालयातील काळे साहेब, प. स. समितीचे उपसभापती संजय साळुंखे, सरपंच नैनेश कांबळे, उपसरपंच अमोल निकम, भाजपचे जिल्हा चिटणीस दीपक पिसाळ, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन सूर्यकांत निकम, माजी सरपंच विकास साळुंखे, ग्रामीण रुग्णालयाच्या आधीकारी, मंडलधिकारी, ग्रामविकास अधिकारी, तलाठी,ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!