लॉकडाऊन संदर्भात निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून शहरातील सर्व दुकाने सुरू करणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

सातारा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने व्यापारी, कामगार व सामान्यांची झाली गैरसोय

स्थैर्य, सातारा दि 27 : सततच्या लॉक डाऊनमुळे आर्थिक कोंडी झालेल्या सातारा शहरातील व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली. पुढील पाच दिवसासाठी लागू करण्यात आलेला  लॉक डाऊन मागे घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली.

दरम्यान व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळांनी प्रशासनाने काही अटी शर्तीवर जो लॉक डाऊन शिथिल केला आहे त्या संदर्भात तातडीने बैठक घेण्याचा निर्णय घेतला, प्रशासनाने लॉक डाऊन उठवला नाहीतर सर्व व्यापारी पेठांमधील दुकाने सरसकट सुरू करण्याची भूमिका व्यापार्‍यांनी प्रसारमाध्यमांसमोर मांडली . माजी उपनगराध्यक्ष जयेंद्र चव्हाण, व्यावसायिक वसंत जोशी, सुदीप भट्टड, ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी पुन्हा जाहीर झालेल्या सशर्त लॉक डाऊनच्या विरोधात जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची भेट घेतली . व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकार्‍यांशी तब्बल अर्धा तास चर्चा केली . सातार्‍यात सततच्या लॉक डाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत . त्याला चालना देण्यासाठी सध्या पुढील पाच दिवस लागू करण्यात आलेला लॉक डाऊन मागे घेण्यात यावा अशी मागणी व्यापार्‍यांच्या बतीने करण्यात आली . सातारा शहरात सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही त्यामुळे ठराविक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवावी लागत आहेत असे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी सांगितले, सातार्‍यात काय उपाययोजना करता येतील याची माहिती शेखर सिंग यांनी व्यापार्‍यांकडून घेतली. पुणे शहरात रस्त्याच्या दुतर्फा असणारी दुकाने आळीपाळीने उघडली जातात. तसा प्रयोग सातार्‍यात करणे शक्य आहे का ? जिल्हाधिकार्‍यांच्या या प्रस्तावाला फारशी पसंती देण्यात आली नाही . सातार्‍याचे नागरिक व व्यापारी यांनी वेळोवेळी लॉक डाऊनच्या दरम्यान प्रशासनाला चांगले सहकार्य केले आहे. प्रश्‍न केवळ पाच दिवसांचा आहे . पुढील महिन्यात या विषयावर व्यापारी वर्गाचा अभिप्राय घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही जिल्हाधिकार्‍यांनी दिली . व्यापार्‍यांची जिल्हा प्रशासनाशी मुद्देसूद चर्चा झाली मात्र कोणताही थेट निर्णय घेण्यात त्यांनी असमर्थता दर्शविली . परिणामी सातारा शहरातील शंभरहून अधिक व्यापार्‍यांनी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात बैठक बोलाविली आहे. जिल्हा प्रशासनाने जर लॉकडाऊन संदर्भात निर्णय न घेतल्यास मंगळवारपासून शहरातील सर्व दुकाने सरसकट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल असा इशारा व्यापार्‍यांच्या वतीने देण्यात आला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!