स्थैर्य, पुणे, दि.१३: शहरात शाळा सुरू
करण्याबाबत 13 डिसेंबरपर्यत निर्णय घेतला जाणार होता. त्यानुसार पुण्यात 3
जानेवारीपर्यंत शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. राज्यात
काही ठिकाणी 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू झाल्या आहेत. त्यावेळी पुणे शहरात
शाळा 14 डिसेंबरपर्यत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता शाळा
बंदचा कालावधी आणखी वाढवण्यात आला आहे. याबाबतची माहिती पुण्याचे महापौर
मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
राज्य सरकारने 23 नोव्हेंबरपासून 9 वी ते
12 वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली. मात्र, याबाबतचा
निर्णय स्थानिक प्रशासनावर सोपवला होता. त्यानुसार पुणे महापालिका
क्षेत्रातील शाळा सुरू करण्याबाबत 13 डिसेंबरनंतर निर्णय घेतला जाईल, असे
महापौरांनी जाहीर केले होते.