स्थैर्य, सातारा, दि.०१: मध संचालनालय महाबळेश्वर, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांच्यामार्फत राज्यातील सर्व जिल्ह्यात मध केंद्र योजना (मधमाशा पालन) राबवण्यात येत आहे. या योजनेंतर्गत मधमाशा पालन करण्याबाबतचे तांत्रिक प्रात्यक्षिके व जनजागृती या विषयावर एक दिवसाचे शिबीर घेण्यात येत असून शेंद्रे ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतक भवन येथे मंगळवार दि. २ रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ४ यावेळेत वाघेश्वरी एग्रो शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
वाघेश्वरी ऍग्रो कंपनी यांच्यामार्फत घेण्यात येणार्या या शिबीरात मध योजना, शासकीय योजना, कृषी योजना, आत्मा योजना, निसर्गातील वसाहतींचे संकलन व संगोपन, मधाची गुणवत्ता व तपासणी याबाबतचे मार्गदर्शन आणि मधमाशा पालन याबाबत शासकीय तज्ञ अधिकार्यांकडून माहिती दिली जाणार आहे. या शिबीरास अजिंक्यतारा कारखाना कार्यक्षेत्रातील शेतकरी आणि सातारा जिल्ह्यातील शेतकर्यांनी उपस्थित राहून शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन वाघेश्वरी ऍग्रो कंपनीच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, मधसंचालनालय महाबळेश्वरचे संचालक डी. आर. पाटील, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी एन. एम. तांबांळी यांनी केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या शिबिरात सोशल डिस्टंसिंगचे काटेकोर पालन करण्यात येणार असून मास्क आणि सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे. अधिक माहितीसाठी संतोष कदम मोबा. ९२७०६६९००० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.