दैनिक स्थैर्य | दि. 28 जुलै 2024 | कोळकी | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहराचे उपनगर असलेल्या कोळकी गावामध्ये शासनाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवणार असून यामध्ये प्रामुख्याने लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना व असंघटित कामगारांसाठी असलेली योजना राबवण्यासाठी भारतीय जनता पार्टी कायदा आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संदीप कांबळे यांच्यावतीने राबविण्यात येणार आहे; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कोळकी गावामध्ये घरोघरी जाऊन फॉर्म भरण्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे. त्यावेळी जयकुमार शिंदे बोलत होते. यावेळी ॲड. संदीप कांबळे, रणजीत जाधव, गोरख जाधव, महेश गायकवाड, किरण भांडवलकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जयकुमार शिंदे यांनी सांगितले की; भाजपचे पदाधिकारी घरोघरी जाऊन हे अर्ज भरणार आहेत. तरी सर्व महिला भगिनी यांनी लाभ घ्यावा शासनाच्या वतीने ज्या काही योजना मिळतात त्या मिळवुन देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. गावात ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकाचे वयोश्री योजनेचे अर्ज कोळकीतील श्रीराम जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने भरण्याचे सुरू केले आहे. तसेच बांधकाम असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या ज्या योजना मिळतात त्याचा लवकरच मोठ्या प्रमाणात कॅम्प लावून फॉर्म भरण्यात येणार आहेत. तरी शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावकऱ्यांनी घ्याव्या असे आवाहन करण्यात आले आहे.