राजे गटाच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास : जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे; दिपक चव्हाण यांना मतदान करण्याचे आवाहन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२४ | फलटण | विधानपरिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दिपकराव चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यात आला आहे.

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये भरघोस असा विकास करण्यात आला आहे. विविध विकासकामे ही राजे गटाच्या माध्यमातून मार्गी लावण्यात आली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या तिकिटावर दिपकराव चव्हाण यांना पुन्हा निवडून द्यावे; असे मत जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी व्यक्त केले.

फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघात गत १५ वर्षांपासून दिपक चव्हाण हे फलटण तालुक्याचा विकास करण्यामध्ये यशस्वी झाले आहेत. दिपक चव्हाण यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये फलटण तालुक्यासह कोरेगाव तालुक्यातील जो भाग फलटण मतदारसंघात आहे त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असल्याचे दिसून येत आहे.

आगामी काळामध्ये फलटण तालुक्याची विकासाची चाके बंद न होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकराव चव्हाण यांना तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्हावर मतदान करून निवडून द्यावे; असे मत सुद्धा जेष्ठ नेते दत्तोपंत शिंदे यांनी व्यक्त केले आहे.


Back to top button
Don`t copy text!