फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील सर्व प्राथमिक शाळा सुरु; विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ ऑक्टोबर २०२१ । फलटण । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे दीड वर्षापासून बंद असलेल्या प्रा. शाळा दि. ४ ऑक्टोबर पासून उत्साहात सुरु झाल्या असून शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प, मिठाई, पुस्तके देवून स्वागत केले आहे.

फलटण तालुक्यात २३ केंद्रांच्या अखत्यारीत एकूण १३६ प्रा. शाळा असून त्यामध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी च्या वर्गात ५ हजार २६९ विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांना विद्यादानाचे काम ५०० शिक्षक करतात शाळा सुरु झाल्यानंतर ३ हजार २१२ विद्यार्थी शाळांमध्ये दाखल झाले आहेत, तर ५०० शिक्षकांपैकी ४९३ शिक्षकांनी उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.

इयत्ता ५ वी ते ८ वी च्या वर्गांमध्ये आदरकी बु|| केंद्रातील ७ शाळांमध्ये १०५ विद्यार्थी असून त्यापैकी ८१, आरडगाव केंद्रातील ९ शाळांमध्ये ३७७ विद्यार्थी असून त्यापैकी १७१, बिबी केंद्रातील ९ शाळांमध्ये ३२३ विद्यार्थी असून त्यापैकी २२०, ढवळ केंद्रातील ११ शाळांमध्ये २७० विद्यार्थी असून त्यापैकी १६६, दुधेबावी केंद्रातील ५ शाळांमध्ये १३२ विद्यार्थी असून त्यापैकी ६१, गिरवी केंद्रातील ४ शाळांमध्ये १५० विद्यार्थी असून त्यापैकी १०९, जावली केंद्रातील ३ शाळांमध्ये २५५ विद्यार्थी असून त्यापैकी १३१, खुंटे केंद्रातील ६ शाळांमध्ये २५५ विद्यार्थी असून त्यापैकी १७०, मुंजवडी केंद्रातील २ शाळांमध्ये १२२ विद्यार्थी असून त्यापैकी ६९, निंभोरे केंद्रातील १० शाळांमध्ये ३०७ विद्यार्थी असून त्यापैकी १९४, निंबळक केंद्रातील ७ शाळांमध्ये ३९० विद्यार्थी असून त्यापैकी २२३, पाडेगाव फार्म केंद्रातील ५ शाळांमध्ये १६२ विद्यार्थी असून त्यापैकी ११५, पवारवाडी केंद्रातील ४ शाळांमध्ये २३३ विद्यार्थी असून त्यापैकी ११२, फरांदवाडी केंद्रातील ६ शाळांमध्ये २९२ विद्यार्थी असून त्यापैकी १९५, पिंप्रद केंद्रातील ७ शाळांमध्ये ३७५ विद्यार्थी असून त्यापैकी २४९, राजाळे केंद्रातील ५ शाळांमध्ये २९३ विद्यार्थी असून त्यापैकी १५६, राजुरी केंद्रातील ७ शाळांमध्ये ४७७ विद्यार्थी असून त्यापैकी २२१, साखरवाडी केंद्रातील ४ शाळांमध्ये ४९ विद्यार्थी असून त्यापैकी ३२, तरडफ केंद्रातील ९ शाळांमध्ये १४७ विद्यार्थी असून त्यापैकी १२८, तरडगाव केंद्रातील ९ शाळांमध्ये ३३५ विद्यार्थी असून त्यापैकी २४२, विडणी केंद्रातील ३ शाळांमध्ये ८९ विद्यार्थी असून त्यापैकी ७७, झिरपवाडी केंद्रातील ४ शाळांमध्ये १३१ विद्यार्थी असून त्यापैकी ९० विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी आर. व्ही. गंबरे यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!